गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली, दि. 2 – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरद्वारेच ही माहिती दिली. कोरोनाची लक्षणं जाणवल्याने त्यांनी चाचणी केली होती, या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आपल्या ट्विटमध्य अमित शहा म्हणाले की, ‘कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी चाचणी करून घेतली आणि चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. माझी तब्येत व्यवस्थित असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रु’ग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी कृपया स्वत:ला आयसोलेट करावं आणि चाचणी करून घ्यावी.’
लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त दिल्ली आयसीसीआरने ‘लोकामान्य टिळक स्वराज्य ते आत्मनिर्भर भारत’ या वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये अमित शहाही सहभागी राहिले होते.
