Tuesday, June 16, 2026
PUNE

मातंग अस्मिता संघर्ष सेना पुणे शहर यांच्या प्रयत्नातून मास्क आणि सेनिटायझर वाटप करून अभिवादन सोहळा संपन्न

पुणे, दि १ – बहुजन नायक साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मातंग अस्मिता संघर्ष सेना पुणे शहर यांच्या प्रयत्नातून व संस्थापक अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आण्णा भाऊ साठे स्मारक येरवडा येथे मास्क व सेनिटायझर चे वाटप करून समाजातील युवकांन समोर आदर्श निर्माण केला यावेळी सोशल डिसटेंन्सचे व शासनाच्या आदेशाचे पालन करित जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष सागर सदाकळे यांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा व स्वतंत्र आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावे अशी मागणी केली सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा सर्व शासनाचे नियम मोडून संघटनेच्या व समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर साखळी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
या वेळी पुणे शहर अध्यक्ष कैलास ससाणे पुणे शहर उपाध्यक्ष राकेश झोंबाडे पुणे कार्याध्यक्ष अमोल कसबे मनान भाई सय्यद प्रशांत ससाणे जितेंद्र लोणके सनी अडागळे उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading