Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

कोरोना – मंगळवारी २२४ मृत्यू आणि ५ हजार १३४ नवीन रुग्ण

पुण्यात ६४० पॉझिटिव्ह

मुंबई, दि.७: राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२, वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.

७   जुलै   पुण्यातील करोना रुग्ण स्थिती ……….- दिवसभरात  ६४० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ६७२- बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे एकूण रुग्ण – १४४११-  आज दिवसभरातील एकूण मृत्यू – २१- पुण्यातील एकूण मृत्यू – ७५१-  शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ३८५-  व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ६३- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २३०२१- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ७८५९-  आजच्या घेतलेल्या  एकूण चाचण्या- ३४६७ + ३८६रॅपिड टेस्ट – आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या १४१२१७

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading