fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

गंभीर जखमी मुलीला वंचितचे कायदेशीर व आर्थिक मदतीचे आश्वासन

नांदेड, दि. ७ – वंचित बहुजन आघाडीच्या महिला राज्य सचिव डॉ विजया धर्मराज चव्हाण यांनी आज नांदेड शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली, तिचे सांत्वन करून तिला कायदेशीर व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीला कठोर शासन करण्यासाठी हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली.

एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडलेल्या या प्रकरणात आरोपी लक्ष्मण खवले याला परभणी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीला चाकूने भोसकून आरोपी फरार झाला होता. दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. गंभीर जखमी मुलीला परभणी व नंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रसंगी वंचितच्या नांदेड दक्षिण महिला अध्यक्ष देवशाळा पांचाळ, रेखा धबडगे,राज्य समन्वक डॉ धर्मराज चव्हाण, परभणी जिल्हा उपाध्यक्ष सरदार चांदसिंग, सिद्धार्थ कांबळे, संपत नंद, परभणी महासचिव सुभाष सोनवणे, नांदेड महासचिव प्रो.बेले, राज्य समन्वयक अरुण गिरी , बी, आर.आव्हाड, सरस्वती खंदारे यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading