fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

डिजिटल शिक्षणातुन अध्यापन : कॅम्प मधील शाळांचा प्रयोग यशस्वी

पुणे, दि. 24 – भारतात वेगाने पसरत असणा-या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅम्प परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये म्हणून डिजिटल शिक्षणावर भर दिला व विद्यादानाचे कार्य ऑन लाईन चालू ठेवले आहे.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल,अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल,इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथे दिनांक 16 एप्रिल पासून विद्यार्थ्यांना या झूम अॅपद्वारे शिक्षण देण्याचे कार्य आजतागायत चालू आहे. इयत्ता 6 वीं ते 11 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यादवारे शिक्षण देण्यात येते. प्राथमिक वर्गात विद्यार्थ्यांच्या सहभाग सुरुवातीला इंटरनेट च्या अडचणींमुळे कमी होता तरी नंतर वाढला. 8 वी ते 11 वीं पर्यंत 60 ते 70 विदयार्थी ऑनलाईन वर्गात उपस्थित असतात. इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना तीन तास प्रतिदिन शिक्षण दिले जाते,तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

दिनांक 16 जून रोजी अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या सर्व शिक्षकांना गूगल क्लासरूम चे प्रशिक्षण देण्यात आले,अशी माहिती मुख्याध्यापक परवीन शेख यांनी दिली.विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे केले जावे.यासंबंधी तसेच शिक्षणाची प्रक्रिया आणखी मनोरंजक व प्रभावी कसे करू शकाल याचे उत्तम मार्गदर्शन यावेळी शिक्षकांना मिळाले.गूगल क्लासरूम मध्ये पाठ्यपुस्तकाचा वापर,यू टूबचा वापर ,तर विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे,त्यांचे गूणदान करणे यासंबंधी प्रशिक्षण सर्व शिक्षकांना देण्यात आले.शिक्षकांचा चांगला प्रतिसाद यासाठी मिळाला.शिक्षकांना प्रशिक्षण देताना सामाजिक अंतर ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.
पारंपरिक अध्यापन पद्धतीपेक्षा ऑनलाईन अध्यापन पद्धती नवीन असली तरी विद्यार्थ्यांनी जुळवून घेतले आहे,अशी माहिती अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल च्या मुख्याध्यापक आयेशा शेख यांनी दिली.येथे सहावी ते दहावी पर्यंतचे १ हजारहून अधिक विध्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये के जी पासून बारावी पर्यंत चे विद्यार्थी ऑन लाईन शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आठवड्याचे वेळा पत्रक तयार करण्यात आले आहे,अशी माहिती मुख्याध्यापक मोहम्मद इब्राहिम जहागीरदार यांनी दिली.व्हिडीओ,पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन,वर्क शीट च्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे.
ऑन लाईन अध्ययन आणि अध्यापनासाठी सर्व सुविधा महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.कोरोना साथीच्या काळात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.मात्र,जीवन शिक्षणाच्या दृष्टीने पारंपरिक पद्धतीला पर्याय नसल्याचे मत अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी व्यक्त केले.लवकरात लवकर कोरोनाची साथ आटोक्यात येऊन विध्यार्थ्यांच्या पारंपरिक शिक्षणाला सुरुवात व्हावी,असेही ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: