मेंढपाळांवरील होणाऱ्या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा विशेष कायदा करण्यासाठी विधान परिषदेमध्ये आवाज उठवणार
बारामतीमध्ये नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार
बारामती, दि. 23 – राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांवरती हल्ले होत आहेत यासाठी सुरक्षितेचा विशेष कायदा करणे गरजेचे आहे याबाबत मी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे. लॉक डाउन संपल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळांना भेटण्याचा दौरा करणार आहे यामुळे मेंढपाळांनी घाबरून न जाता मी तुमच्यासोबत आहे तुमच्यासाठी मी विधान परिषदेमध्ये विशेष सुरक्षा कायदा करण्यासाठी आवाज उठवणार असल्याचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे,ते बारामती येथे भाजपा कार्यालयात सत्कार समारंभासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजासाठी एक हजार कोटींची पॅकेज जाहीर केले होते,त्याची अंमलबजावणी मात्र या सरकारकडून अद्याप झालेली नाही हे याबाबत पडळकरांना विचारले असता महाविकास आघाडी सरकारची नियत खोटी व हे सरकार प्रचंड जातीयवादी आहे. याचं बारामती मध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उद्यान आहे , परंतु आताच्या सरकारने विश्वासघात करून सत्ता मिळवली तर बारामती येथील उद्यानात जाणीवपूर्वक पाण्याची टाकी बांधून,त्यांची नियत आणि नीती धनगर समाजाबद्दल कशी साफ नाही हे दाखवून दिले अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली,याबाबत मी सभागृहामध्ये आवाज उठवणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले,यासंबधी विषयावर त्यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा देखील केली
इथून पुढे मी बारामतीतील प्रश्न सोडवण्याचे व बारामातीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले तसेच माझ्यावर विश्वास टाकून ज्यांनी मला मतदान केलं अशांचे देखील आभार त्यांनी मानले.