fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

इराने रिव्हिल केला अमीर खानचा न्यू लूक

लॉकडाउनच्या काळात बॉलीवूडमधील अनेक सेलेब्सने आपल्या लुक्‍सवर एक्‍सपेरिमेंट करताना दिसून आले आहेत. कोणी आपली दाढी वाढली, तर कोणी आपला हेयरकट स्वतः केले. परंतु असेही काही कलाकार आहेत जे वयोवृद्ध झाल्याचे दिसून आले, ज्यांचे केस पांढरे झाले आहेत. यात बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्‍शिनिस्ट आमीर खानचीही परिस्थिती अशीच काहीशी झाली आहे.

“फादर्स डे’निमित्त त्याची मुलगी इराने आमीर खानला विश केले होते. तिने सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोतील आमीरचा न्यू लुक पाहून सर्वच जण आश्‍चर्यचकीत झाले आहेत. आमीर खानचे सर्वच केस हे पांढरे झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याने हेयरकट केल्याचेही दिसतेय. आमीरचा हा नवीनी लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लुकवर चाहत्यांनी अनेक मजेशीर अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

दरम्यान, आमीर खानची मुलगी सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. ती सतत कोणते ना कोणते फोटो शेअर करत असती. ती लाइमलाइटपासून दुर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. परंतु आमीर खान हा सोशल मीडियापासून चार हात लांब असतो. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आमीर खानचा “लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: