fbpx

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 3 हजार 800 हून अधिक कोरोनाबाधित

रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर

मुंबई, दि.२०: कोरोनाच्या  ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा आहे. राज्यात आज १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या  ६४ हजार १५३  झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ९४ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१३६ (मुंबई १३६), नाशिक-१० (जळगाव १०), पुणे-६ (पुणे ५, सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ६, जालना १), लातूर-१ (बीड १).

Leave a Reply

%d bloggers like this: