देव गिल फाउंडेशन तर्फे पुण्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूर व विद्यार्थ्यांसाठी मोफत बसेस
पुणे, दि. १९ – प्रख्यात टॉलीवूड अभिनेता देव गिल (भाग मिल्खा भाग, मगधीरा फेम) यांनी प्रवासी कामगार आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करण्यासाठी देव गिल फाउंडेशन अंतर्गत हा उपक्रम आयोजित केला होता. यां उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देव गिल फाउंडेशन च्या वतीने स्वखर्चाने दोन बसेस चे आयोजन करण्यात आले होतो ज्यामध्ये ५० लोकांना आपापल्या घरी रवाना करण्यात आले. या दोन बस विदर्भ व मराठवाडा या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी बोलताना अभिनेते श्री देव गिल म्हणाले, “लॉकडाऊन च्या काळात मी माझ्या पुण्यातील औंध येथील घरी वास्तव्यास होतो त्यावेळी मी आजूबाजूच्या गरीब लोकांची कठीण अवस्था पहिली. त्यांना सर्वतोपरी मदत मी देण्याच्या प्रयत्न केला आहे. आता पुण्यात अडकलेल्या महाराष्तील मजूर व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी या बसेस चे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मला कलेक्टर ऑफिस, पोलीस दल व वैद्यकीय विभागाचे खूप सहकार्य लाभले त्यांच्या मदतीनेच हे लोक स्वगृही जाऊ शकत आहेत.” ते पुढे म्हणाले “मला या उपक्रमाच्या आयोजनात माझ्या कुटुंबीयांनी व मित्रांनी खुप मदत केली आहे.””
घरी जाणारे लोक देव गिल यांचे खूप आनंद आणि कृतज्ञ होते. त्यातील एकजण म्हणाले, “या लॉकडाऊन दरम्यान आम्ही आर्थिक अडचणीत होतो आणि देव गिल यांनी आम्हाला सर्व प्रकारे मदत केली. आता तो आम्हाला घरी जाण्यास मदत करत आहे आम्ही त्याच्या प्रयत्नांचे खरोखर आभारी आहोत. ”
यावेळी तहसीलदार श्रीमती तृप्ति कोलते पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार, औंध तलाठी मुजीब शेख, डीसीपी पुणे पोर्निमा गायकवाड, एसीपी लक्ष्मण बोराटे, पीआय औंध माया देवरे, शशिकांत कांबळे संस्थापक अध्यक्ष आंबेडकर समिती व देव गिल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.