Sunday, June 21, 2026
PUNE

चीन सीमेवरील हुतात्मा भारतीय सैनिकांना पुण्यातील मशिदींमध्ये श्रद्धांजली

ऑन लाईन नमाज दरम्यान सैन्यासाठी दुवा पठण

पुणे, दि. 19 – चीन सीमेवरील चकमकीत वीर गती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना पुण्यातील मशिदींमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली .
शुक्रवार (जुम्मा ) च्या ऑन लाईन नमाज दरम्यान दुवा पठण करण्यात आले त्यात वीर गती प्राप्त झालेल्या शूर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी दुवा पठण करण्यात आले.हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कसोटीच्या प्रसंगात साथ देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.

आझम कॅम्पस शैक्षणिक ,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार यांनी या संबंधी शुक्रवारी सकाळी सर्व मशिदींच्या धर्मगुरू आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवाहन केले होते . त्या नुसार पुण्यातील सर्व मशिदींमध्ये शुक्रवार चे (जुम्मा) नमाज दरम्यान दुवा पठण करताना या भूमिकेचा उच्चार करण्यात आला. आझम कॅम्पस मशिदीमध्ये ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले . शहरातील इतर मशिदींमध्ये पेश इमाम यांनी दुवा पठण केले . मात्र ,कोरोना साथीमधील नियमांनुसार मशिदीमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करण्यात आली नाही.

आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवारच्या ‘फेसबुक लाईव्ह’ नमाज पठणास प्रतिसाद
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे .
मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे.अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.१९ जून रोजी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.
एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते. https://www.facebook.com/azamcampus1922

मागील महिन्यात रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading