कोरोना लढाई दीर्घकाळ चालणारी, केंद्राची थेट मदत हवी सल्ले नको – पृथ्वीराज चव्हाण
पुणे, दि. 19 – “कोरोना संसर्ग विरोधी लढाई” दीर्घकालीन चालणारी असून, अर्थचक्राचा वेग मंदावणारी आहे. त्या करीता व्यक्तिगत प्रतिकार शक्ती, शारीरिक पथ्ये बरोबरच सामाजातील “अर्थकारणाची पोकळी”भरून काढण्यासाठी सरकारने कृती केली पाहिजे.. त्या करिता तातडीने रोजंदारीवर पोट असणार्यांसाठी थेटअर्थ सहाय्य केले पाहिजे, अन्यथा “रोजगाराच्या चक्रात व विवंचनेत सामाजिक वावर व अंतर पाळण्याची पथ्ये गरिबांना पाळता येणार नाहीत”.. जनतेला पोकळ सल्ले देवून काम भागणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

राजीव गांधी स्मारक समिती’ व ‘गोपाळदादा तिवारी मित्र परिवार’ यांच्या वतीने तर्फे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित आयोजित कार्यक्रमांत चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमात पुणे मनपा हॉस्पिटल्सचे’कोरोना योद्धा’रुपी डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ इ ना “प्रतिबंधात्मक साहित्य” पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सेनिटायझेशन बाटल्या, रोग प्रतिकारक व्हिटामिन सी,डी व झिंग गोळ्या इ. साडे पाचशेहून अधिक साहित्याचे वाटप पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.. प्रास्ताविक प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. स्वागत सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ संजीव वावरे यांनी केले व मनपा तर्फे करणायत येणारे कोरोना रुग्ण प्रतिबंधक कार्याचे स्वरूप विषद केले.
या प्रसंगी कमला नेहरू हाॅस्मापीटल डाॅ मंदार नागमोडे, राजीव जगताप, सुर्यकांतजी मारणे, भाऊ शेडगे, रवी मोहिते, राजेंद्र खराडे, प्रसन्न पाटील, जयसिंग भोसले, गौरव बोराडे, योगेश भोकरे, महेश अंबिके, नितीन पायगुडे, संजय अभंग, अशोक काळे, शंकर शिर्के, गणेश कुरे, आशिष गुंजाळ इ उपस्थित होते. राजेंद्र खराडे यांनी आभार मानले..