कोरोना – परभणीकरांना दिलासा संक्रमीत कक्षात अवघे 4 रुग्ण
परभणी , दि.17 (प्रतिनिधी)- नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून मंगळवारी(दि.16) प्राप्त अहवालापैकी 20 संशयित रुग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संशयित रुग्णांची संख्या 2539 असून 2735 पैकी 2504 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 80 स्वॅबचा अहवाल अनिर्णायक आला असून 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा प्रयोगशाळेद्वारे अभिप्राय आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 93 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. 86 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे चार कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.
मंगळवारी रुग्णालयात एकूण 14 संशयित दाखल झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या वतीने त्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करीत त्यांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. एकूण पाठविलेल्या स्वॅबची संख्या 15 आहे. नांदेड प्रयोगशाळेत एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या 15 एवढीच राहिली आहे. मंगळवारी नांदेड प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालापैकी 20 जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारपर्यंत विलगिकरण कक्षात 243, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 22 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 2443 जण आहेत.