fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

कलावंताच्या न्याय हक्कासाठी  झटणाऱ्या बाबासाहेब पाटिल यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी

पुणे- महाराष्ट्र विधान परिषदेवर लवकरच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या सामाजिक , साहित्यिक व कला क्षेत्राशी संबंधित सदस्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात..
सध्या सगळा देश तसेच महाराष्ट्र आणि चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्र हे करोना या महामारीच्या संकटाने अक्षरशः उध्वस्त झाले आहे. या संकटामुळे गेल्या तीन महिन्यापासून रोजंदारीवर काम करणारे बॅकस्टेज कलावंत आणि शेकडो वंचित कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे..त्यांच्या पुढिल दोन वर्षांचे आर्थिक नियोजन करण्याचा महत्त्वाचा सिझन पण निघुन गेला आहे..त्यामुळे येत्या काळात साहित्य, चित्रपट, नाट्यक्षेत्र असेल किंवा कलाक्षेत्र असेल यामध्ये काम करणा-या सर्वच कलावंताना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे.

अशा वेळी त्यांना धर्याने सोबत घेवून त्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडून त्यांच्यासाठी विविध सोयी सवलती व शासनाच्या योजनेतून भरीव अशी मदत, पॅकेजस् मिळवण्यासाठी तसेच या क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेच्या सोयी सुविधा असतील किंवा जेष्ठ कलावंतांच्या पेन्शनचे प्रश्न असतील
त्यांचे आर्थिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, घरकुलांचे प्रश्न तसेच त्यांच्या भविष्यातील नियोजनाचा विषय असेल अशा अनेक विषयांना घेवून योग्य रितीने व प्रभावी पध्दतीने शासन दरबारी मांडून कलावंतांच्या बाजूने त्यांच्या न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची जाण असणा-या व्यक्तीची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष व या सर्व प्रश्नांसाठी गेल्या पाच वर्षांपासून अहोरात्र झटणारे, सर्व विभागातील कलावंताना आपलेसे वाटणारे व कलावंताच्या समस्यांची खडान खडा माहिती असणारे त्या समस्या सतत सोडविण्यासाठी प्रभावीपणे झटणारे, लावणी व लोककलेतील दिग्गज कलावंतही ज्यांच्याकडे आशेने आणि अपेक्षेने पाहतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. नियोजनबध्द व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्व विभागात कार्यक्षम
विभाग म्हणून चित्रपट व सांस्कृतिक विभागाची ओळख आहे ते फक्त बाबासाहेब पाटिल यांच्या दूरदृष्टीने केलेल्या कार्यामुळे. अशा या सर्वसाधारण कुटुंबातुन आलेल्या, सामान्य कार्यकर्त्याला व उमद्या युवा नेतृत्वाला व वंचित कलावंतासाठी काही तरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या बाबासाहेब पाटिल यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी डाॅ प्रशांत गेडाम, सिध्देश्वर झाडबुके प्रदेश उपाध्यक्ष व विनोद खेडकर, वंदन नगरकर प्रदेश सरचिटणीस आणि प्रमोद रणनवरे शहराध्यक्ष पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी व विविध कलावंतानी पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading