fbpx
Thursday, September 28, 2023
MAHARASHTRA

चिंताजनक, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 3 हजार हुन अधिक कोरोनाबधित तर 152 मृत्यू

पुणे 268 पॉझिटिव्ह, 7 मृत्यू आणि 207 कोरोनामुक्त

मुंबई, दि. 11 – राज्यात आज 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या 152 मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 1 एप्रिल ते 8 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 117 मृत्यूपैकी मुंबई 87, मीरा भाईंदर 8, कल्याण डोंबिवली 7, सोलापूर 7, नवी मुंबई 4, नाशिक 3 आणि वसई विरार 1, अशी संख्या आहे.

राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.

मुंबई महानगरपालिका – 54085 (मृत्यू 1954) ठाणे – 15679 (मृत्यू 398) पालघर- 1842 (मृत्यू 47) रायगड- 1636 (मृत्यू 58) नाशिक – 1746 (मृत्यू 100) अहमदनगर- 224 (मृत्यू 9) धुळे – 341 (मृत्यू 25) जळगाव- 1336 (मृत्यू 120) नंदुरबार – 45 (मृत्यू 4) पुणे- 10882 (मृत्यू 447) सातारा- 701 (मृत्यू 27) सोलापूर- 1578 (मृत्यू 120) कोल्हापूर- 675 (मृत्यू 8) सांगली- 195 (मृत्यू 4) सिंधुदुर्ग- 145 रत्नागिरी- 381 (मृत्यू 15) औरंगाबाद – 2306 (मृत्यू 123) जालना- 225 (मृत्यू 6) हिंगोली- 214 परभणी : 80 (मृत्यू 3) लातूर: 152 (मृत्यू 6) उस्मानाबाद: 140 (मृत्यू 3) बीड: 66 (मृत्यू 2) नांदेड: 186 (मृत्यू 9) अकोला: 927(मृत्यू 40) अमरावती: 310 (मृत्यू 20) यवतमाळ: 170 (मृत्यू 2) बुलढाणा: 103 (मृत्यू 3) वाशिम: 20 (मृत्यू 2) नागपूर: 919 (मृत्यू 12) वर्धा: 14 (मृत्यू 1) भंडारा: 46 गोंदिया: 68 चंद्रपूर: 46 गडचिरोली: 45

सध्या राज्यात 5,73,606 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 75,493 खाटा उपलब्ध असून सध्या 28,066 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांपेक्षा रिकव्हर झालेले रुग्ण जास्त

1.रायगड, 2.नाशिक, 3.अहमदनगर, 4.धुळे, 5.नंदूरबार, 6.पुणे, 7.सातारा, 8.कोल्हापूर, 9.सांगली, 10.रत्नागिरी, 11.औरंगाबाद, 12.जालना, 13.हिंगोली, 14.परभणी, 15.लातूर, 16.उस्मानाबाद, 17.बीड, 18.नांदेड, 19.अकोला, 20.अमरावती, 21.यवतमाळ, 22.बुलडाणा, 23.नागपूर, 24.वर्धा, 25.भंडारा, 26.गोंदिया, 27.चंद्रपूर आणि 28.गडचिरोली या जिल्ह्यांत उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. म्हणजे राज्यातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांपेक्षा रिकव्हर झालेले रुग्ण जास्त आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: