आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चे शूटिंग लवकरच
देशात 30 जनूपर्यत लॉकडाउन असून यात चित्रपटांना शूटिंग करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यात आता संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित “गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. यातील आलिया भट्टचा फर्स्ट लुक सर्वांनाच भावला आहे. तिच्या या नव्या लुकची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे.
तिच्या सुंदर चेहऱ्यामागे बरेच रहस्य लपलेले आहेत. या भूमिकेसाठी आलियाने खास तयारी केली आहे. या चित्रपटात “वन्स अपॉन अ टाइम’ या चित्रपटातील सुपरहिट जोडी अजय देवगण आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इम्रानने या अगोदरच शूटिंग सुरू केले होते. आता अजग देवगणच्या शूटिंगची प्रतीक्षा केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच इम्रानने आलियासोबत चित्रपटातील काही भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात अजय देवगण गॅंगस्टर करिम लालाची भूमिका साकारत आहे. मात्र, इम्रानच्या भूमिकेविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
या चित्रपटाचे सर्वाधिक आकर्षण असणार आहे ती आलियाची भूमिका. या चित्रपटात ती गंगुबाईची भूमिका साकारत आहे. तिच्या या लुकला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.