fbpx
Thursday, December 7, 2023
PUNE

लॉकडाऊन आधीचे विद्यार्थी व इतर ‘प्रवासी पास’ ची मुदत वाढवून द्या,  संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे, दि. १० – शहर आणि जिल्हा १००% रेडझोन मध्ये आहे. दि. २२ मार्च ते आजपर्यंत संपूर्ण देशभर ‘कोरोना’ या रोगाच्या साथीमुळे प्रवासी वाहतूक १००% बंद आहे. दरम्यान ज्या विद्यार्थी कामगार व अन्य पास धारकांनी लॉकडाऊन च्या आधी पास काढले होते व त्या पासची लॉकडाऊन नंतर जेवढे दिवस मुदत शिल्लक आहे अशा सर्व पासधारकांना लॉकडाऊन संपताच ‘राज्य परिवहन महामंडळा’ची वाहतूक सुरू होताच वाढीव मुदतीत प्रवास करता आला पाहिजे या पासधारकांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.

लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरिक कामगार पालक व विद्यार्थी आर्थिक संकटात आहेत. प्रवासी वाहतूक आपणच बंद केली असल्याने मुदत वाढ करून देणे ही मागणी उचित असून आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहेत तत्पूर्वी सर्व पासधारकांना मुदत वाढवून न दिल्यास दिनांक १५ जून पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताबडतोब निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांना सूचित करावे. लॉकडाऊन नंतर शिल्लक दिवस प्रवासी पासची मुदत वाढवून द्यावेत ही नम्र विनंती. सात दिवसात निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी आणि कामगारांसह आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देत आहोत.

मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या पुणे विभाग अधिकारी यामिनी जोशी यांना निवेदन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, पुणे शहर संघटक संजय चव्हाण, संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल निंबाळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d