fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

थ्रोबॅक फोटो शेअर करत दीपिकाने दिल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा आज (10 जून) वाढदिवस आहे. यानिमित्ताने दीपिकाने सोशल मीडियावर एक प्रेमळ संदेश लिहून आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसत आहे.

दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘पडद्यामागील महान नायक, काश मी देखील त्यांच्यासारखी होऊ शकले असते. केवळ एका क्षेत्रातील यश संपादन करून खरा चॅम्पियन बनता येत नाही, परंतु ते एक चांगला माणूस होण्यासाठी आहे, ही शिकवण दिल्याबद्दल धन्यवाद. 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो #पापा #पदुकोण ‘

यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी वडिलांच्या बॅडमिंटन अकादमीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीपिकाने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ‘बॅडमिंटन आणि भारतीय खेळांमध्ये तुमचे योगदान अतुलनीय आहे. तुमच्या समर्पण, शिस्त, दृढनिश्चय आणि बर्‍याच वर्षांच्या कठोर मेहनतीबद्दल तुमचे धन्यवाद. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जसे आहात, त्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

%d bloggers like this: