fbpx

सॅमसंग ‘गॅलेक्सी टॅब एस6 लाईट’ भारतात लाँच

सॅमसंग इंडियाने भारतात आपला नवीन टॅबलेट ‘गॅलेक्सी टॅब एस6 लाईट’ लाँच केला आहे. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी टॅब एस6चे हे लाईट व्हर्जन आहे. नवीन टॅबमध्ये देखील एस-पेन मिळेल. या टॅबची बॉडी मेटलची असून, याला खास लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहे.

गॅलेक्सी टॅब एस6 लाईटमध्ये 10.4 इंच डिस्प्ले देण्यात आले असून, याचे वजन 467 ग्रॅम आहे. याच्या पेनचे वजन केवळ 7.03 ग्रॅम आहे. हा टॅब अँड्राईड 10वर आधारित One UI 2.0 वर काम करतो. यात 2.3 गीगाहर्ट्ज सॅमसंग एक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओसाठी एकेजी सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स देण्यात आलेले आहे. यात डॉल्बी एटमॉस 3डी साउंडचा देखील सपोर्ट मिळेल. या टॅबद्वारे युजर कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकतात. यात व्हर्च्युअल असिस्टेंट बिक्सबीचा सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात मागील बाजूला 8 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 7,040 एमएएच बॅटरी मिळेल. लहान मुलांसाठी यात अनेक अ‍ॅप्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय सॅमसंगने टॅबसाठी नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफायसोबत भागीदारी केली आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळेल.

किंमतीबद्दल सांगायचे तर याच्या एलटीई व्हर्जनची किंमत 31,999 रुपये आहे. तर वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. यासोबत अनेक ऑफर्स देखील ग्राहकांना मिळतील. यासोबत ग्राहकांना 11,900 रुपयांचे गॅलेक्सी बड्स केवळ 2,999 रुपये आणि 4,999 रुपयांचा टॅब बुक कव्हर 2,500 रुपयांमध्ये मिळेल. 17 जूनपासून अ‍ॅमेझॉन इंडिया, सॅमसंग स्टोर, रिटेल स्टोर व इतर ई-कॉमर्स साईटवर टॅबची विक्री सुरू होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: