जान्हवी कपूरचा ‘हा’ चित्रपट नेटफ्लिक्सवर होणार रिलिज
बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल आहे. या चित्रपटानंतर तिची बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. आता बोनी कपूरच्या आगामी बॉम्बे गर्ल या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ही घोषणा केली आहे. ‘विमान मुलाने उडवले किंवा मुलीने उडवले त्या दोघांनाही वैमानिकच म्हणतात. गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित एक व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटाची रिलिज डेट अद्याप समोर आलेली नाही.