fbpx

परभणी जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णसंख्या झाली 80, आजपर्यंत 2 बळी

परभणी – शनिवारी(दि.30) सकाळी वाघी बोबडे(ता.जिंतूर) येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती मृत्यू पावल्याच्या पार्श्‍वभूमीवर अवघ्या काही तासात नांदेड येथील प्रयोगशाळेकडून राञी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखीन सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.
एकूण ८०कोरोनाबाधित रुग्णांत परभणी शहरातील इटलापूर मोहल्लातील तीन , गंगाखेड-ः-नागठाणा एक, जिंतूरः सांवगी भांबळे दोन रुग्णांचा समावेश आहे. एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या८० एवढी झाली असून त्यामुळे जिल्ह्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड येथील प्रयोग शाळेत एकूण 319 व्यक्तीचे अहवाल प्रलंबीत होते. शुक्रवारी रात्री 105 रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार 6 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यात पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील 2, गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील 1, सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील एकाचा तसेच जिंतूर व मानवत शहरातील प्रत्येकी एकाचा अशा एकूण सहा जणांचा समावेश होते.
शुक्रवारी रात्रीच्या या अहवाला पाठोपाठ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 पर्यंत पोचली. त्या पाठोपाठ शनिवारी सकाळी वाघी बोबडे येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन झाली. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी सकाळपासून शासकीय यंत्रणा चिंतातूर असतांनाच तसेच रात्री कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू असतांना शनिवारी रात्री आणखीन सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने शासकीय यंत्रणेत मोठी अस्वस्थता पसरली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: