fbpx

दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा – अमिता कुलकर्णी

“हृदयात समथिंग समथिंग” चित्रपटाच्या निमित्तानं अशोक सराफ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसोबत काम करता आलं, हा अनुभव समृद्ध करणारा होता असं मत नुकतंच अभिनेत्री अमिता कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. सुरवातीला दिग्गजांसोबत काम करताना टेन्शन यायचं पण ज्यापद्धतीने कलाकार सेट वर साधपणाने वावरतात, सगळ्यांशी मिळून राहतात त्यामुळे दडपण कमी होऊन काम करायला मज्जा येते. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, भूषण कडु, स्नेहा चौहान , प्रियंका यादव असे अनेक दिग्गज कलाकार होते त्यांच्यासोबत काम करून आनंद झाला.

अमिता कुलकर्णी नागपूरजवळील गोंदियाची असून याअगोदर ती ‘ कुवारा है पर हमारा है ‘, ‘ तुमच आमच जमल डॉट॰ कॉम’ यातून रसिकांच्या समोर आली आहे, लवकरच ती पुन्हा एका मल्टिस्टारर “रिस्पेक्ट”, “लग्नकल्लोळ” या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: