fbpx
Saturday, December 2, 2023
TECHNOLOGY

आयआयएससी व टॅलेण्‍टस्प्रिंट सहयोगाने उदयोन्‍मुख व वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञानांमधील अभ्‍यासक्रम सादर करणार

डिजिटल हेल्‍थ व इमेजिंगवरील पहिला अभ्‍यासक्रम जुलै २०२० मध्‍ये सुरू होणार

बेंगळुरू, : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स या विज्ञान व अभियांत्रिकीमधील प्रगत शिक्षण आणि संशोधनासाठी असलेल्‍या भारताच्‍या आघाडीच्‍या संस्‍थेने टॅलेण्‍टस्प्रिंटसोबत दीर्घकाळापर्यंत सहयोग जोडला आहे. अॅडवान्‍स सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल हेल्‍थ अॅण्‍ड इमेजिंग हा या सहयोगांतर्गत सादर करण्‍यात येणारा पहिला अभ्‍यासक्रम आहे. जुलै २०२० मध्‍ये या अभ्‍यासक्रमाला सुरूवात होईल. ईहेल्‍थ, वैयक्तिकृत आरोग्‍यसेवा, बायोटेक, वैद्यकीय डिवाईसेस, वेअरेबल्‍स व डिजिटल थेरपीटिक्‍समधील अत्‍याधुनिक तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍समध्‍ये निपुण होण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या व्‍यावसायिकांवर लक्ष केंद्रित करणारा सहा महिन्‍यांचा अभ्‍यासक्रम कार्यकारी शिक्षणासाठी संयोजित स्‍वरूपात सादर करण्‍यात येईल. पहिल्‍या निवडक ५० उमेदवारांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा https://iisc.talentsprint.com/digitalhealth/.

याप्रसंगी बोलताना आयआयएससीचे संचालक प्राध्‍यापक अनुराग कुमार म्‍हणाले, ”आमचे संशोधन व अध्‍यापनासह डॉक्‍टरल व पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमावरील भर जगप्रसिद्ध आहे. टॅलेण्‍टस्प्रिंटसोबतचा सहयोग आम्‍हाला वैयक्तिक विद्यार्थ्‍यांसाठी कार्यकारी शिक्षण देण्‍यामध्‍ये साह्य करेल. पहिला अभ्‍यासक्रम अॅडवान्‍स सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल हेल्‍थ अॅण्‍ड इमेजिंग डेटा सायन्‍सेस व बायोमेडिकल सायन्‍सेसशी निगडित आहे. हा विभाग गेल्‍या काही वर्षांमध्‍ये उदयास आला आहे आणि कोविड-१९च्‍या प्रादुर्भावामुळे या विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”  

टॅलेण्‍टस्प्रिंट सहयोगाबाबत बोलताना सीसीई अध्‍यक्ष प्राध्‍यापक जी एल शिवकुमार बाबू म्‍हणाले, ”आम्‍ही कार्यकारी स्‍वरूपामध्‍ये आमचे अभ्‍यासक्रम सादर करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्‍ये आयआयएससीच्‍या अनुभवासह टॅलेण्‍टस्प्रिंटचे डिजिटल डिलिव्‍हरी व्‍यासपीठ iPearl.AI वरील लाइव्‍ह इंटरअॅक्टिव्‍ह सत्रांचा समावेश आहे. हा दृष्टीकोन आम्‍हाला आमच्‍या ऑफरिंग्‍ज वाढवण्‍यामध्‍ये आणि जगभरातील विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचत त्‍यांना प्रभावी अध्‍यापन व अध्‍ययन अनुभव देण्‍यामध्‍ये मदत करेल. आम्‍हाला या सहयोगाचा खूप आनंद झाला आहे. तसेच आम्‍ही पुढील काही वर्षांमध्‍ये विविध अभ्‍यासक्रम सादर करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

टॅलेण्‍टस्प्रिंटचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शंतनू पॉल म्‍हणाले, ”आयआयएससीसोबतचा सहयोग एक मोठा सन्‍मान आहे आणि आम्‍हाला त्‍याचा अभिमान वाटत आहे. पहिल्‍या अभ्‍यासक्रमामधून आरोग्‍यसेवेमधील तीव्र जागतिक समस्‍या आणि उदयोन्‍मुख २८० बिलियन डॉलर्स हेल्‍थटेक क्षेत्राची मागणी दिसून येते. हा अभ्‍यासक्रम क्लिनिकल डेटा सायन्‍स, बायोटेक्‍नोलॉजी, फार्मास्‍युटिकलस, इन्‍शुअरटेक, मेडिकल सायन्‍स व स्‍टार्ट-अप्‍समधील विद्यमान व महत्त्वाकांक्षी व्‍यावसायिकांसाठी अत्‍यंत योग्‍य आहे. या सर्व व्‍यावसायिकांसाठी डिजिटल हेल्‍थकेअर हे निश्चितच नवीन क्षेत्र असणार आहे.”

आयआयएससी येथील कॉम्‍प्‍युटेशनल अॅण्‍ड डेटा सायन्‍सेस विभागामधील सहयोगी प्राध्‍यापक डॉ. फणींद्र यलावर्ती अॅडवान्‍स सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल हेल्‍थ अॅण्‍ड इमेजिंगचे नेतृत्‍व करतील. त्‍यांच्‍यासोबत आयआयएससीमधील अव्‍वल कर्मचा-यांची टीम असणार आहे आणि ते कार्यकारी स्‍वरूपामध्‍ये या अभ्‍यासक्रमाचे अध्‍यापन करतील. हा अभ्‍यासक्रम जुलै २०२० मध्‍ये सुरू होणार आहे. अॅडवान्‍स सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल हेल्‍थ अॅण्‍ड इमेजिंगमध्‍ये उत्‍सुक असलेले व्‍यावसायिक https://iisc.talentsprint.com/digitalhealth/. येथे निवडप्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.     

Leave a Reply

%d bloggers like this: