fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

पुणेकरांना दिलासा, कोरोनाबधित रुग्णांची टक्केवारी घसरली

पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून मागील 15 दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण जवळपास दुप्पट केले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत जाऊन या चाचण्यांमध्ये सरासरी 12 टक्‍के नव्याने बाधित आढळून येत होते. मात्र, हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली असून एकूण चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचा आकडा आता 8 टक्‍के झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित प्रमुख 10 शहरांच्या यादीत पुणे बाधितांच्या प्रमाणानुसार, 6 व्या क्रमांकावर आहे. तर, राज्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर असून मुंबईत चाचण्यांच्या प्रमाणात बाधितांची संख्या तब्बल 23 टक्‍के आहे.

१

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने नियंत्रणासाठी चार आयएस अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्‍ती केली. त्यांच्याकडून प्रमुख हॉटस्पॉट भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला प्रत्येक दिवशी अवघ्या 600 ते 700 जणांचे नमुने घेतले जात होते. मात्र, हॉटस्पॉट घोषित केल्यानंतर हा आकडा 1,700 ते 2 हजारांवर गेला. त्यामुळे बाधितांचा आकडाही वाढला होता.
राज्यात मुंबई पाठोपाठ सर्वाधिक चाचण्या पुण्यात घेण्यात येत आहेत. शहरात पहिला रुग्ण आढळल्यापासून आतापर्यंत 45 हजार 2067 चाचण्या घेतल्या. हा आकडा 1 लाख लोकसंख्येमागे 5 हजार 753 चाचण्या आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत प्रमाण 1 लाख लोकसंख्येमागे 7 हजार 97 इतके आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: