fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 85 व्या स्मृतीदिनानिमित्त कोविड योध्दयांचा सत्कार

पुणे, दि. 28 – महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 85 व्या स्मृतीदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित अभिवादन सोहळ्यात कोविड योध्दयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, नगरसेविका लता राजगुरु, कुणाल राजगुरु, रिपब्लिकन युवा मोर्चाचे युवा नेते राहुल डंबाळे, रमेश सकट, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त संदिप कदम, बाबासाहे कांबळे, प्रा. बाबासाहेब जाधव, सदाशीव तळेकर आणि शकुंतला भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 85 व्या स्मृतीदिनाचे आैचित्य साधून महामाता रमामाईच्या विचारांना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी करोनाच्या पार्श्वभुमीवर कार्य करणारे करोना योध्दे म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचारी रश्मी भोकसे, सफाई कामगार मंदाताई पाचकुडे आणि डाॅक्टर सेवा गलांडे यांचा गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि नगरसेविका लता राजगुरु यांच्या हस्ते पंचशिलाची शाल, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले, तर कुणाल राजगुरु यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: