fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

‘आॅनलाईन पोवाडयाद्वारे’ स्वातंत्र्यशाहीर सावरकरांना अभिवादन

पुणे : जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे… या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताचे कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकासमोर जाऊन फेसबुक लाईव्हद्वारे सादरीकरण करीत शाहीरांनी त्यांना नमन केले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पोवाडयाच्या माध्यमातून तर, रा.स्व.संघाचे पुणे महानगर बौद्धिक प्रमुख प्रा.सुधीर गाडे यांनी व्याख्यानातून सावरकर विचार दर्शन सादर करीत आॅनलाईन पद्धतीने सावरकरांना अभिवादन केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे हा आॅनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी युवा शाहीर होनराजराजे मावळे व मुकुंद कोंडे यांनी पोवाडयाला साथसंगत केली. स्वातंत्र्यशाहीर सावरकरांनी बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिला, त्यातील भाग हेमंत मावळे यांनी सादर केला.

प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे म्हणाले, कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आले असून सार्वजनिक कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आॅनलाईन पद्धतीने फेसबुकद्वारे पोवाडयातून आम्ही आदरांजली अर्पण केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक पोवाडे लिहून समाजाचे प्रबोधन केले आहे. त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्यशाहीर म्हणून देखील आपण गौरव करायला हवा.

प्रा.सुधीर गाडे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांनी जे मातृभूमीसाठी जे कष्ट उपसले, त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही. स्वातंत्र्यवीरांचे जीवन आपण पाहतो, तेव्हा आजही त्यांची आठवण होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा ध्यास घेतला व पुढच्या आयुष्यात सशस्त्र संघर्ष उभा केला. आज युवा पिढी वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतली आहे. त्यामुळे नवयुवकांना स्वातंत्र्यवीरांचे चारित्र्य समजावून सांगायला हवे.

One thought on “‘आॅनलाईन पोवाडयाद्वारे’ स्वातंत्र्यशाहीर सावरकरांना अभिवादन

  • Shahir Hemantraje Mavale.

    मनःपूर्वक धन्यवाद .

    Reply

Leave a Reply

%d bloggers like this: