fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

‘आनंदवन’ तर्फे प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्यांचे वाटप

पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वत:ची काळजी घेण्याकरीता नागरिकांना उद्युक्त करण्यासोबतच आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करणा-या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे शिवाजीनगर घोले रस्ता परिसरासह इतर भागातील ५ हजार नागरिकांना वाटप करण्याचा शुभारंभ झाला. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नागरिकांना गोळ्यांचे वाटप करीत कोरोनाविरुद्ध खंबीरपणे लढण्याचे आवाहनही केले. 
आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रासोबतच पुणे शहर भाजपाने देखील या उपक्रमाकरीता पुढाकार घेतला. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार आदी उपस्थित होते. सामान्य नागरिकांसह वृतपत्र विक्रेता संघातील वर्तमानपत्रे वितरीत करणा-या मुलांना देखील गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन तेवढे चांगले आहे. या विषाणुविरोधात लढण्याकरीता स्वत:च्या शरीराला बळकट करण्याकरीता होमिओपॅथीक औषधे उपयुक्त आहेत. त्यामुळे आहार, व्यायामासोबतच या गोळ्यांचा देखील उपयोग होईल. 
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील योद्ध्यांना तसेच सामान्य नागरिकांना या गोळ्या विनामूल्य देण्यात येणार आहेत. आनंदवन व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहेच. तसेच, त्यासोबत कोरोना लढयात देखील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता नागरिकांना सहाय्य करीत आहे. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त चांगला आहार व व्यायाम करीत आपले आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: