fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

संकटाच्या काळात उद्योजकांनी जिद्दीने उभे राहण्याची गरज

सु्क्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय,भारत सरकार (एमएसएमई), एमपीएफ पुणे, बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी यांच्यावतीने उद्योजकांसाठी वेबीनारचे आयोजन  

पुणे : भारतातील सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग भारताच्या ३० टक्के जीडीपीमध्ये योगदान देतात. तर ५० टक्के आयात याच प्रकारातील उदयोगांमार्फ त होते. त्यामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे स्थान भारतामध्ये मजबूत आहे. परंतु कोरोनामुळे आज प्रत्येक उद्योगधंद्यासमोर अडचणी उभ्या आहेत. त्यातून सावरण्यासाठी जिद्दीने उभे राहण्याची गरज आहे. असा सूर उद्योजकांसाठी आ़योजित परिसंवादात उमटला. 
 सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग  मंत्रालय भारत सरकार, एमपीएफ पुणे आणि बॉम्बे चार्टर्ड अकांउंटंट यांच्या वतीने एमएसएमईचे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल या विषयावर आॅनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सीए आनंद बाठिया, सीए चिराग दोशी, सीए मनीष संपत, मृणाल मेहता सहभागी झाले होते. सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग  मंत्रालय भारत सरकार पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक मुंदडा यांच्या पुढाकाराने परिसवांदाचे आयोजन करण्यात आले.
आनंद बाठिया म्हणाले, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगधंदे आहेत. तर महाराष्ट्राचे स्थान यामध्ये ४ थ्या क्रमांकावर आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक सुक्ष्म,लघु आणि मध्यम प्रकारातील उद्योग धंदे आहेत आणि २०१९ च्या सर्वेक्षणानुसार भारताचा उद्योजकांच्या निर्मितीत दुसरा क्रमांक येतो. उद्योजकांची भूमी म्हणून देखील भारताला ओळखण्यात येते.
दीपक मुंदडा म्हणाले, उद्योजकांसाठी शासनाकडे विविध योजना आहेत. परंतु अनेक उद्योजकांना ते माहिती नसल्यामुळे त्याचा फायदा त्यांना घेता येत नाही. उदयोग जगताला विविध योजनांची माहिती मिळवून देण्यासाठी दोन दिवसीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रत्येक उद्योजकाने एमएसएमईमध्ये आपले नाव नोंदवावे जेणेकरुन शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा उद्योजकाला घेता येईल. असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading