fbpx
Friday, December 8, 2023
MAHARASHTRAPUNE

पुण्यात दिवसभरात तब्बल 399 कोरोना रुग्ण, 10 बळी

3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, पुणे विभागात 7 हजार 218 कोरोना बाधित

पुणे : पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर अ‍ॅक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 395 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 283, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 20, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 309 कोरोना बाधीत रुग्ण असून 120 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 590 कोरोना बाधीत रुग्ण असून 265 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 273 आहे. कोरोना बाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 79 कोरोना बाधीत रुग्ण असून 46 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 341 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 326 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 72 हजार 855 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 64 हजार 607 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57 हजार 280 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 218 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

%d