fbpx
Friday, December 8, 2023
TECHNOLOGY

जिओचे 5 सर्वात स्वस्त प्लान, फ्री कॉल आणि डेटा

Reliance Jio (रिलायन्स जिओ) चे प्रीपेड रिचार्जच्या यादीत कंपनीचे खूप सर्व प्लान आहेत. वेगवेगळ्या किंमतीत युजर्संना या प्लानमध्ये वेगवेगळी पद्धतीची सेवा मिळते. काही प्लानमध्ये फ्री कॉलिंग, एसएमस तर काही प्लानमध्ये जास्त डेटा दिला जातो. कंपनीकडे वेगवेगळ्या गटात स्वस्तातील प्लान, प्रसिद्ध प्लान, ऑल इन वन प्लान उपलब्ध आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेत्तृत्त्वाखाली रिलायन्स जिओने नुकताच सर्वातील स्वस्त प्रीपेड प्लान बंद केला आहे. परंतु, कंपनीकडे या प्लान व्यतिरिक्त अजून दुसरे प्लान आहेत. जे कमी किंमतीत चांगले बेनिफिट्स देतात. रिलायन्स जिओ देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ नेहमीच आपल्या युजर्संना नवीन ऑफर्स देण्याचा प्रयत्न करीत असतात रिलायन्स जिओच्या स्वस्त प्रीपेड प्लानसंबंधी जाणून घेऊयात… सर्वात आधी आपण १२९ रुपयांचा रिलायन्स जिओबद्दल जाणून घेऊ. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. २ जीबी हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते. याशिवया या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड आणि दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १००० मिनिट्स दिले जातात. युजर्संना या प्लानमध्ये ३०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा युजर्संना मिळते. जिओचा १४९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये युजर्संना २४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा म्हणजेच एकूण २४ जीबी डेटा मिळतो. १ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. या प्लानमध्ये युजर्संना जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यसााठी ३०० मिनिट दिले जातात. युजर्संना या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. तसेच युजर्संना या पॅकमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना १.५ जीबी डेटा दरदिवशी दिला जातो. म्हणजे युजर्संना या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. युजर्संना जिओ टू जिओ अनलिमिटेड तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाी १००० मिनिट्स दिले जातात. या प्लानमध्ये युजर्संना दरदिवशी १०० एसएमएस फ्री मिळतात. या शिवाय, मनोरंजनासाठी युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. युजर्संना या प्लानमध्ये दररोज मिळणारा २ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते. जिओ नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्संना १ हजार मिनिट्स मिळतात. जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये युजर्संना दररोज १०० एसएमएस फ्री दिले जातात. बाकीच्या रिचार्ज प्रमाणे जिओच्या २४९ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओच्या या प्लानची किंमत ३४९ रुपये आहे. तसेच या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. कंपनीच्या या प्लानमध्ये युजर्संना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. दरदिवशी मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर या इंटरनेटची स्पीड कमी होते. या प्लानमध्ये युजर्संना जिओ टू जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते तर अन्य नेटवर्कवर कॉलसाठी १००० मिनिट मिळते. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री दिले जातात. तसेच युजर्संना या प्लानमध्ये सुद्धा जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

Leave a Reply

%d