fbpx

उन्हाळ्यातही चेहरा तजेलदार हवा असेल तर काय करायला हवे , जाणून घ्या

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची देखभाल घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आपल्या त्वचेचं होतं. कडक उन, दमट हवा यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय वाईट परिणाम होतात. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते, त्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे टॅनिंग, रॅशेज, मुरुम, घामोळे आणि सन बर्नचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये, यासाठी चेहऱ्याची योग्य देखभाल करणं आवश्यक आहे. तुम्हाला बाजारामध्ये कित्येक महागडे सनस्क्रीन आणि अन्य प्रॉडक्ट्स मिळतील. पण या केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टमुळे तुमच्या त्वचेला फायदा होईलच असे नाही. यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता मात्र अधिक असते. तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यासाठी घरगुती फेस पॅकचा वापर करावा. घरगुती उपचारांमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. शिवाय तेलकट त्वचेची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळेल. चंदन फेस पॅकमुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत मिळते. त्वचेवरील रॅशेज कमी होतात. मुख्य म्हणजे आपली त्वचा मऊ होते. सामग्री – तीन चमचे चंदन पावडर – एक किंवा दोन चमचे कच्चे दूध – चिमूटभर केसर फेस पॅक तयार करण्याची विधि – एका वाटीमध्ये कच्च्या दुधात केसर भिजत ठेवा – थोड्या वेळानं यामध्ये चंदन पावडर मिक्स करा – ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा – चंदनमुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो – या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात – मास्क सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या काकडी आणि कोरफड जेल फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो. यामुळे त्वचेवर होणारी जळजळ कमी होईल. तसंच निस्तेज आणि निर्जीव त्वचेची समस्या कमी होईल. या मास्कमुळे सनबर्न आणि सुरकुत्यांचाही त्रासही कमी होतो. कोरफडीमध्ये पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सिडेंट्सचे भरपूर प्रमाण आहे. या पॅकचा तुम्ही योग्य पद्धतीनं वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांतच सकारात्मक बदल दिसून येईल. सामग्री – अर्धी काकडी – एक चमचा कोरफड जेल फेस पॅक तयार करण्याची विधि – काकडीवरील साल काढून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा – आता कोरडफ जेलमध्ये ही पेस्ट मिक्स करून घ्या – आता हे फेस पॅक चेहऱ्यावर लावा – १५ मिनिटांनंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या – आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता पपईमधील पोषक तत्त्वांमुळे चेहऱ्यावर चमक येते. यामध्ये असणाऱ्या पपाईन घटकामुळे आपली त्वचा मऊ होते. चेहऱ्याच्या छिद्रांमधील दुर्गंध बाहेर फेकली जाण्यासही मदत मिळते. त्वचेवरील मृत पेशींची समस्या देखील कमी होते. यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. सामग्री – एक वाटी पपईचा गर – एक चमचा चंदन पावडर – अर्धा चमचा कोरफड जेल – गुलाब पाणी फेस पॅक तयार करण्याची विधि – पपईचा गर मिक्सरमध्ये वाटून घ्या – पपईच्या पेस्टमध्ये चंदन पावडर आणि कोरफड जेल मिक्स करा – आता यामध्ये गुलाब पाण्याचा समावेश करा – ही पेस्ट चेहरा आणि मानेवर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा – पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुऊन घ्या बेसनमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध बाहेर फेकली जाण्यास मदत मिळते. तुमचा चेहरा खोलवर स्वच्छ होतो. तसंच मुरुमांची समस्याही कमी होते. सामग्री – तीन चमचे बेसन – एक चमचा गुलाब जल – लिंबू रसाचे काही थेंब – चिमूटभर हळद फेस पॅक तयार करण्याची विधि – सर्व सामग्री एकत्र करून फेस पॅक तयार करून घ्या – ही पेस्ट मान आणि चेहऱ्यावर लावा – फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या – आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता टोमॅटोमुळे आपल्या चेहऱ्यावर चमक वाढते. टोमॅटो आणि साखरेच्या फेस मास्कमुळे चेहरा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होतो. टोमॅटोमधील पोषक गुणधर्मांमुळे निस्तेज आणि निर्जीव त्वचा नाहीशी होते. त्वचेचा रंग देखील उजळतो. सामग्री – एक छोटा टोमॅटो – एक चमचा साखर फेस पॅक तयार करण्याची विधि – टोमॅटो बारीक कापून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करा – आता यामध्ये साखर मिक्स करा – हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा – हलक्या हातानं आपल्या चेहऱ्याचा मसाज करा. – थोड्या वेळानं चेहरा पाण्यानं धुऊन घ्या. साबण किंवा फेस वॉशचा वापर करू नका. – आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.

Leave a Reply

%d bloggers like this: