fbpx

‘या’ देशात सुरू झाले क्रिकेट

करोनाच्या तडाख्यामुळे सुमारे दोन महिने पूर्णपणे बंद असलेला क्रिकेटचा खेळ अखेर मैदानावर परतला. कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेच्या माध्यमातून करोनाच्या हाहा:कारानंतरचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. सॉल्ट पाँड ब्रेकर्स आणि ग्रेनेडिन डायवर्स या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. त्यात सॉल्ट पाँड ब्रेकर्स संघाने विजय मिळवला. त्याचसोबत एकाच दिवसात लीग स्पर्धेत आणखी दोन सामनादेखील खेळवण्यात आले. दुसऱ्या डर्सन मलोनी याच्या १९ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या बळावर ला सोफ्रिअर हायकर्स संघाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात डार्क व्ह्यू एक्सप्लोरर्स संघ विजयी झाला. विन्सी प्रीमियर टी १० लीग स्पर्धेत वेस्ट इंडिज संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सॉल्ट पाँड ब्रेकर्स आणि ग्रेनेडिन डायवर्स या पहिल्या सामन्यात डायवर्स संघाने १० षटकात सर्वबाद ६८ धावा केल्या. ब्राउन (२४) आणि पीअर (१४) वगळता कोणताही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. स्ट्रफने ३ बळी टिपले. ब्रेकर्स संघाने ६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ९.२ षटकात केला. त्यांनी ४ चेंडू आणि ३ गडी राखून सामना जिंकला. थॉमसने २० तर नेडने नाबाद १५ धावा केल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: