fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

पुण्याच्या कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे अविरत सेवाकार्य   

पुणे:  कोरोना विषाणू साथीच्या  तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे सेवाकार्य सुरूच असून आज बुधवारी विविध ठिकाणी झालेल्या वैद्यकीय शिबिरात २५०० रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. 
बुधवार दि. २० मे २०२० रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर  सेलच्या सर्व पदाधिकारी आणि पुणे महानगरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून अतिशय काटेकोर पद्धतीने सुरू असलेल्या डॉक्टर आपल्या दारी अभियाना अंतर्गत पुण्यातील विविध कंटेन्मेंट, रेड झोनप्रमाणे इतरही क्षेत्रात २५०० हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले.

हडपसर येथील पांढरे मळा व काळेबोराटे नगर, ससाणे नगर परिसरात नगरसेवक योगेश ससाणे यांच्या सहकार्याने डॉ.सुहास लोंढे, डॉ.शंतनु जगदाळे, डॉ मंगेश वाघ, डॉ सचिन लोंढे, डॉ नितीन नेटके या  डॉक्टरांनी ९०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषधे वाटप केली. त्यात १० संशयित रुग्णांना अधिक तपासणीसाठी पालिका हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

पर्वती पायथा जनता वसाहत येथे प्रिया गदादे- पाटील,  शिवाजी गदादे -पाटील यांच्या सहकार्याने डॉ. रणजित निकम, डॉ. विजयसिंह देसाई, डॉ.चंद्रशेखर जावळकर, डॉ.महेश साबळे, डॉ. कैलास चरखा यांनी ४५० रुग्णांची तपासणी केली.

 संतोष फरांदे, सौ अश्विनी  भागवत, सागर भागवत यांच्या सहकार्याने मोहन नगर परिसरातील आर के हॉस्टेलजवळ धनकवडी येथे डॉ अनुपमा गायकवाड, डॉ मयुरा टेकडे, डॉ ज्योती तुसे, डॉ ज्योती रसाळ, डॉ रचना जाधव ह्या महिला कोव्हीड वारीअर्स डॉक्टर टीमने  ३०० पेक्षा जास्त रुग्णांना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले.

प्रभाग क्र. ३५, शंकर महाराज वसाहत येथील दाट वस्तीत स्वतः अश्विनी नितीन कदम यांनी त्यांच्या  सहकाऱ्यांच्या मदतीने डॉ. सचिन ढमाले, डॉ. प्रदीप उरसळ, डॉ सुनील धुमाळ, डॉ हिरेमठ यांनी ६४० रुग्णांची तपासणी करून कोव्हीड स्क्रिनिंग साठी त्यातले काही रुग्ण वेगळे काढले.

नगर रोडवरील खुले वाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ नगरसेवक भैय्यासाहेब जाधवांच्या सहकार्याने डॉ राजश्री पोखरणा, डॉ रुपाली दिघे, डॉ भाऊसाहेब जाधव, डॉ अर्जुन चव्हाण, डॉ दत्ता भोसले टीमने ४०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप केले व स्क्रिनिंग साठी काही रुग्ण वेगळे काढण्यात आले.

या अभियानात डॉक्टरांकडून पीपीई किट, थर्मल गन द्वारे, फेस शिल्ड, सोशल डिस्टन्सिंग चे सर्व निकष पाळले जात आहेत. डॉ. सुनिल जगताप यांच्या निर्देशानुसार ठरल्याप्रमाणे शिबिरातून अधिकाधिक रुग्ण वेगळे मनपाच्या डॉक्टरांकडून त्यांची तपशीलवार पुन्हा तपासणी केली जावी या अनुषंगाने पृथक्करण करण्यात येतं आहे. यात विशेषतः वयोवृध्द, डायबेटिक, हायपरटेन्शन, श्वसन विकार इ. कोमॉर्बीडीटी रिस्क जास्त असलेले रुग्ण आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: