fbpx

गांधी भवन आणि युक्रांद च्या मदत कार्यात ३५०० किराणा किट चे वाटप 


पुणे : लॉकडाऊनसंपेपर्यंत भुकेशी लढणा-या नागरीकांसाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधी भवन)आणि युवक क्रांती दल (युक्रांद)तर्फे १ एप्रिलपासून १८ मे अखेर पर्यंत सुरू असलेल्या मदतकार्याने ३५००हून अधिक किराणा सामानाच्या किट्स वाटपाचा टप्पा पुर्ण केला आहे.
 डॉ. कुमारसप्तर्षी (अध्यक्ष, युक्रांद आणि गांधी भवन) यांनीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
लॉकडाऊन मुळेअडकलेले प्रवासी श्रमिक,  पुणे शहरातील वस्त्यांमधील अडचणीतीलनागरीक, तृतीय पंथीय, वेश्याव्यवसायातील स्त्रिया,गरजुंना आणि जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण १०लाख खर्चून किराणा सामानाची मदत देण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधीभवन) आणि युवक क्रांती दल (युक्रांद) ने समाजातील विविध घटकांकडून निधी संकलनकेले.   अन्नपुर्णासंस्थेने या मदतकार्यासाठी १०० किट्स दिले.  मशाल, रोटरी क्लब ऑफपुणे स्पोर्टस् सिटी, सृष्टी सांस्कृतिक संस्था, जीवन संस्था,भारतीय समाज विकास व संशोधन संस्था,हेल्पींग हॅन्ड -दिघेमावशी परिवार,व्ही एम सॉफ्ट वेअर,आर जे संग्राम,समता सैनिक दल,सहेली संस्था,अन्नपुर्णा संस्था (मेधाताई सामंत),युनियन बँक अशा अनेक संस्था आणि व्यक्तींनी या मदत कार्यासाठी मदत केली. सचिन चौहान,संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,मुख्तार मणियार,सचिन पांडूळे,अप्पा अनारसे, रवी लाटे, सुदर्शन चखाले यांनी मदत कार्याचे संयोजन केले.या मदतकार्यासाठी चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या नावाने द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.  सरकारने श्रमिकांना आपल्या गावी परतण्यासाठीरेल्वे आणि इतर सोयींची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी काही दिवसलागतील. तोपर्यंत किराणा सामान वाटप अखंड चालू ठेवण्याचा निर्धार या संस्थांनीकेला आहे.  

गांधी भवनच्या संवाद समुपदेशन केंद्राची मदत  

                              लॉकडाऊन काळात ताणतणाव आणि समस्यांसंदर्भातसमुपदेशनाची आवश्यकता असल्याने गांधी भवन कडून समुपदेशनाची सेवा सुरु करण्यात आलीआहे.एड प्रभा सोनटक्केयांच्याशी  मोबाईल नंबर 9823624094 वरसंपर्क साधता येईल.    

आर्थिक मदतीचे आवाहन
——————————-                   
या कार्यात सहभागीहोण्यासाठी किमान रूपये ३००/- देणगी पाठवावी, ही विनंती. ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे  किराणा सामान देता येते,याअनुमानानुसार हे आवाहन करण्यात आले आहे. 

देणगीसाठी गांधी भवन खात्याचे तपशील                 
——————————                         
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code  SBIN0020734 चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: