fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

आशा भोसले यांच्या वाढदिवसापर्यंत आशा गीतांची  ऑनलाईन साप्ताहिकी !

पुणे : कोरोना लॉक डाऊन काळात देखील आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या  गाण्याचे स्वर रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  दर रविवारी आशा भोसले यांचे एक गाणे रेकोर्ड करून सोशल मिडिया च्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम गायिका वृषाली आठवले- मावळंकर यांनी सुरु केला आहे. ८ सप्टेबर २०२० रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे,तोपर्यंत ‘आशा -द व्हर्सटाईल’  हा गीत उपक्रम सुरु राहणार आहे. १७ मे ते ८ सप्टेंबर या काळात १७ रविवार आहेत. दर रविवारी एक याप्रमाणे १७ आशा  गीते त्यांनी निवडली असून त्यात मराठी -हिंदी गीतांचा समावेश आहे.   
 ‘विश्वविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले या माझ्यासाठी दैवत,श्रद्धास्थान आहेत.त्यांचा ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या दैवी सुरांनी  संगीत विश्वाला भुरळ घातली आहे. आशा ताईंच्या संगीतातील ह्या योगदानाबद्दल, सुरेल मानवंदना म्हणून त्यांनी गायलेली वेगवेगळ्या मूड्स,जॉनर ची काही हिंदी व मराठी गाणी रेकोर्ड करून सोशल मिडिया द्वारे  सादर करत आहे. व्हाट्स अप ग्रुप वरून पाठवली जात आहेत. ८ सप्टेंबर २०२०  पर्यंत दर रविवारी एक गाणे रेकॉर्ड करून पाठवायचा मानस आहे,’ असे वृषाली मावळंकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले. १७ मे रोजी आशा भोसले यांच्या  ‘रुपेरी वाळूत ,माडांच्या बनात ये ना ‘ ,’शारद सुंदर चंदेरी राती ‘  या  दोन गाण्यांचा मेडले सादर करून आगळ्या उपक्रमाला प्रारंभ केला. 
  ‘सद्य परिस्थितीत रसिक  प्रेक्षकांसाठी तसेच  सर्व हितचिंतकांसाठी काय करता येईल आणि मी घेत असलेल्या या  सुरांचा आनंद कसा शेअर करता येईल,या  विचारातून ही  संकल्पना सुचली,असे त्यांनी सांगितले. आशा भोसले यांनी गायलेल्या हजारो गीतांमधून १७ ,१८ गीते निवडणे अवघड होते. पण,त्यांच्या आवाजातील वैविध्य आणि सौंदर्य रसिकांपर्यंत पोहोचविणारी निवडक १७ गाणी विचारपूर्वक निवडली,असे वृषाली आठवले -मावळंकर यांनी सांगितले. भक्तीगीत,भाव गीत,लावणी,गझल,कव्वाली,रागांवर आधारित चित्रपट गीत असे अनेक गायन प्रकार या उपक्रमासाठी निवडले आहेत. रसिकांच्या फर्माईशी घेण्याचाही प्रयत्न त्या करणार आहेत. काही रविवारी एका ऐवजी दोन गाणीही सादर केली जाणार आहेत. 
वृषाली यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असून ‘वृष स्वर ‘संस्थेच्या माध्यमातून विविध संकल्पनांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रम सादर केले आहेत. मधुबाला यांच्या वरील गीतांचा कार्यक्रम,हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचनांवरील  कार्यक्रम त्यांनी केले आहेत.मनात झिरपलेल्या हिंदी -मराठी गीतांचा ‘माझिया मना’ यासारखे गीतांचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. त्यापैकी आशा भोसले यांनी गायलेल्या  गाण्यांच्या  ‘स्वराशा ‘ या कार्यक्रमाचे ५० हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत . 

Leave a Reply

%d bloggers like this: