Tuesday, June 16, 2026
Sports

ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनतर्फे भारतीय क्रीडा इकोप्रणालीला पाठिंबा देण्‍यासाठी ‘बॅक ऑन ट्रॅक’ सादर

मुंबई, राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशन (डीएसएफ) या भारताची आघाडीची स्‍पोर्टस् तंत्रज्ञान कंपनी ड्रीम स्‍पोर्ट्सच्‍या (Dream Sports) परोपकारी संस्‍थेने आज अद्वितीय उपक्रम ‘बॅक ऑन ट्रॅक’ (‘Back on Track’) च्‍या सादरीकरणाची घोषणा केली. या उपक्रमाचा भारतीय क्रीडा इकोप्रणालीमधील वंचित खेळाडू, क्रीडा व्‍यावसायिक, अकॅडमीज व सहयोगी भागधारकांना पाठिंबा देण्‍यासोबत आर्थिक साह्य करण्‍याचा मनसुबा आहे. 

महामारीचा भारतातील संपूर्ण क्रीडा इकोप्रणालीसह खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक संस्‍था व क्‍लब्‍सवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वंचित क्रीडा व्‍यावसायिक, खेळाडू व प्रशिक्षकांना साह्य करण्‍यासाठी डीएसएफने ‘बॅक ऑन ट्रॅक’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून क्रीडा साहित्‍य, आहार व पोषण, प्रशिक्षण व कोचिंग, मासिक वेतन व स्‍वच्‍छता किट्सच्‍या रूपात त्‍वरित साह्य करण्‍यात येईल. या उपक्रमाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये डीएसएफने देशभरातील ३०० हून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांना साह्य केले आहे. अशा अधिक खेळाडू व प्रशिक्षकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी आणि सुलभ सुविधा देण्‍यासाठी https://www.dsf.org.in/back-on-track-application-form/ वर मायक्रोसाइट सुरू करण्‍यात आली आहे, जेथे भारतीय क्रीडा इकोप्रणालीमधील सक्रिय व निवृत्त खेळाडू, स्‍पोर्टस् स्‍टाफ, अकॅडमीज, संस्‍था व सर्व संबंधित भागधारक देशाच्‍या कोणत्‍याही कोप-यामध्‍ये सहाय्यतेसाठी अर्ज भरू शकतात.       

प्राप्‍त सर्व अर्जांचे क्रीडा सल्‍लागार व क्षेत्रीय तज्ञांचा समावेश असलेल्‍या समितीकडून अवलोकन व पात्र अर्जांची निवड करण्‍यात येईल. पुढील काही महिन्‍यांमध्‍ये पाठिंब्‍याची खरंच गरज असलेल्‍या किमान ५००० खेळाडूव्‍यावसायिक व सहयोगी भागधारकांपर्यंत पोहोचत त्‍यांना त्‍यांच्‍या उदरनिर्वाहासाठी पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. 

बॅक ऑन ट्रॅक‘ उपक्रमाबाबत बोलाताना ड्रीम स्पोर्टसचे मुख् कार्यकारी अधिकारी  सहसंस्थापक भावित शेठ म्‍हणाले, ”ड्रीम स्‍पोर्टसमध्‍ये आमचा फक्‍त क्रीडाप्रेमींसाठीच नव्‍हे तर संपूर्ण क्रीडा इकोप्रणालीसाठी मेक स्‍पोर्टस् बेटर‘ दृष्टिकोन आहे. या उपक्रमाचा खेळांवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले लोक संधी व संसाधनांपासून वंचित राहणार नाहीत याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही त्‍यांना त्‍यांची ध्‍येये गाठण्‍यामध्‍ये आवश्‍यक पाठिंब्‍यासह मदत करू आणि या ध्‍येयाप्रती कार्य सुरूच ठेवू. बॅक ऑन ट्रॅक‘ हा भारतभरातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्‍यावर लक्ष केंद्रित करणारा दीर्घकालीन स्थिर उपक्रम असेल. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही भारतातील क्रीडाप्रणालीच्‍या विकासाला हातभार लावण्‍यामध्‍ये मदत करू. तसेच आम्‍ही भारतातील खेळ व क्रीडा इकोप्रणालीच्‍या विकासाप्रती कार्य करत असलेले पात्र व्‍यक्‍तीसोसायटीजसंस्‍था किंवा कंपन्‍यांचा स्थिरपणे विकास करण्‍यामध्‍ये देखील साह्य करू.”  

कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये देशाला साह्य करत यंदा वर्षाच्‍या सुरूवातीला ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनने संकटादरम्‍यान ६ लाखांहून अधिक भारतीयांना साह्य केले आहे. डीएसएफने वंचित लोकांना शिजवलेले भोजन, ड्राय रेशन आणि स्‍वच्‍छताविषयक किट्स दिले आहेत, तसेच महाराष्‍ट्र सरकार व बीएमसीच्‍या (बृहन्‍मुंबई महानगरपालिका) प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांना संरक्षणात्‍मक गिअर दिले आहेत. डीएसएफने कोविड-१९ साठी पीएम केअर्स फंड आणि सीएम रीलीफ फंडमध्‍ये देखील योगदान दिले आहे. वर्ष २०१९ मध्‍ये डीएसएफने हाय-५ फाऊंडेशनसोबत सहयोगाने मुंबईच्‍या झोपडपट्टयांमधील २०० वंचित मुलांना व्‍यावसायिक बास्‍केटबॉलचे प्रशिक्षण देण्‍यास सुरूवात केली. वर्ष २०१८ मध्‍ये डीएसएफने एफआयएफएस स्‍टार्स ऑफ टुमारोसोबत भागीदारी केली आहे. स्‍टार्स ऑफ टुमारो सेलिंग, स्‍क्‍वॅश, टेनिस, स्विमिंग व गोल्‍फ अशा विविध मुख्‍य नसलेल्‍या खेळांमधील भारताच्‍या भावी क्रीडा प्रतिभांना साह्य करत आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading