कार्यकर्ता निर्माण करणारे गणेशोत्सव हे विद्यापीठ -डॉ. रामचंद्र देखणे
पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे मोल वेगळेच आहे. समाजाला गरज असणारी व्यक्तिमत्वे वेगवेगळ््या विद्यापीठातून निर्माण होतात. परंतु कार्यकर्ता निर्माण करणारे गणेशोत्सव हे विद्यापीठ आहे. येथे असणारा कार्यकर्ता कला, अर्थ, व्यवहार अशा विविध ज्ञानाने समृद्ध असतो. मंडईतून माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान मिळते. त्यामुळे ते खºया अर्थाने विद्यापीठ आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने मंडई परिसरात काम करणाºया श्रमजीवी वर्गाला धान्य कीटचे वाटप मंडळाच्या समाजमंदिरात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. चंदूकाका सराफ पेढी आणि वंचित विकास संस्थाचे उपक्रमाला सहकार्य मिळाले. यावेळी चंदूकाका सराफ अॅन्ड सन्से संचालक सिद्धार्थ शहा, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, इस्कॉनचे विश्वस्त संजय भोसले, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उद्धव भडसाळकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,खजिनदार संजय मते, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सारंग सराफ, सुनील मिश्रा, प्रणव मलभारे,नारायण चांदणे,उमेश सोनेरी आदी उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय गेले. नैराश्याचा सामना गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला करावा लागला. परंतु याचा सामना करताना आत्मनिर्भरता हरवू नका. आताची वेळ कठीण आहे,परंतु ही वेळ देखील जाईल. असा विश्वास ठेवा. कोरोनाचे संकट जाताना समाजाला वेगळा दृष्टीकोन देऊन जाईल. जाणीवा असलेला समाज यातून निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
अण्णा थोरात म्हणाले, मंडई परिसरात हातावर पोट असणाºया कष्टकºयांचे वास्तव्य आहे. उत्सवाच्या काळात व्यवसाय करुन ते आपला प्रपंच चालवितात. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना शारदा गजाननाच्या प्रसादरुपी धान्याचे वाटप केले. हमाल, बँडवाले, मूर्तीकाम करणारे कामगार, साऊंड लाईटचे कामगार, मंडप कामगार अशा अनेकांना धान्याचे वाटप करण्यात आले. उत्सवाच्या यशासाठी योगदान देणाºयांना ही मदत देण्यात आली आहे.
