Tuesday, August 25, 2026
Latest NewsPUNE

नारायण सेवा संस्थानच्या कृत्रिम अवयवांमुळे ३२८ दिव्यांग व्यक्तींचे स्वावलंबनाच्या दिशेने आशावादी पाऊल

पुणे : जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या 3D-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयवांच्या फिटमेंटसाठी तिरुपती मंगल कार्यालय, टिंगरे नगर, पुणे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. नारायण सेवा संस्थान, उदयपूर, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ३२८ दिव्यांग व्यक्तींना एकूण ३६१ कृत्रिम अवयव व कॅलिपर्स मोफत बसविण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना गतिशीलतेसोबतच आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी उमेद मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक रोहित जैन म्हणाले की, “नारायणसेवासंस्थानचेकार्यहेमानवतावादीसेवेचेउत्कृष्टउदाहरणआहे. अनेकवर्षेइतरांच्यामदतीवरअवलंबूनराहिलेल्याव्यक्तींनास्वतःच्यापायावरउभेराहूनस्वतंत्रपणेचालतानापाहणेहाअत्यंतभावनिकआणिप्रेरणादायीअनुभवआहे.”

नारायण सेवा संस्थानचे विश्वस्त व संचालक देवेंद्र चौबीसा म्हणाले, “आमचेउद्दिष्टकेवळकृत्रिमअवयवउपलब्धकरूनदेणेनाही, तरदिव्यांगव्यक्तींनाआत्मविश्वासआणिसन्मानानेस्वावलंबीबनवणेहेआहे. तंत्रज्ञानाच्यासहाय्यानेविकसितकेलेलेहेआधुनिककृत्रिमअवयवत्यांच्याजीवनातगतिशीलतेसोबतचस्वावलंबनाचानवाविश्वासनिर्माणकरतआहेत.”

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार डुडी म्हणाले की, “हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवा नसून मानवतेचे खरे दर्शन घडवणारा आहे. दिव्यांग व्यक्तीला पुन्हा चालता येणे आणि स्वावलंबी होता येणे, हा केवळ त्या व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक परिवर्तनाचा क्षण असतो.”

शिबिराची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. मेवाडी परंपरेनुसार पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नारायण सेवा संस्थानच्या ४० सदस्यीय तज्ज्ञ पथकाने लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व कॅलिपर्स बसविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. डॉक्टर आणि तांत्रिक तज्ज्ञांनी लाभार्थ्यांना संतुलन राखणे, चालण्याच्या योग्य पद्धती, कृत्रिम अवयवांचा योग्य वापर तसेच त्यांची देखभाल याबाबत मार्गदर्शन केले.

चौबीसा यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आयोजित निवड व मोजमाप शिबिरात ३९६ हून अधिक दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केली होती. त्यापैकी निवड झालेल्या ३२८ लाभार्थ्यांपैकी २६८ लाभार्थ्यांना २७६ नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव, तर ६० लाभार्थ्यांना ८५ कॅलिपर्स बसविण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३६१ कृत्रिम अवयव व कॅलिपर्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी काढलेली प्रेरणादायी पदयात्रा हा कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण ठरला. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना दीर्घ काळानंतर स्वतंत्रपणे चालताना पाहून अनेक कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. काही लाभार्थ्यांसाठी हे आत्मविश्वासाने टाकलेले पहिले पाऊल होते, तर काहींसाठी अनेक वर्षांनंतर पुन्हा मिळालेल्या स्वातंत्र्याची सुरुवात होती. त्यांची प्रत्येक पावले केवळ गतिशीलतेचे नव्हे, तर सन्मान, आत्मविश्वास आणि नव्या आशेचे प्रतीक ठरली.

या प्रसंगी संस्थेचे मुंबई शाखाध्यक्ष महेश अग्रवाल, संरक्षक सत्यभूषण जैन, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष, भिका चौधरी, युवा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष करण अग्रवाल, समाजसेवक डॉ. सौभाग्य गुप्ता, सुरेश चंद अग्रवाल, अनुज सतपाल गर्ग, मुरारी लाल चोंमाल, दीपक मेहता आणि अंजू गोयल यांच्यासह अनेक मान्यवर, समाजसेवक आणि समाजातील सदस्य उपस्थित होते.

शिबिराला CSR विभागाचे प्रमुख राजेंद्र सिंह पंवार यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे प्रभारी हरिप्रसाद लड्डा आणि रमेश शर्मा यांनी व्यवस्थापनाचे समन्वय साधला. ऐश्वर्या त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नारायण सेवा संस्थान १९८५ पासून समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक पद्मश्री कैलाश ‘मानव’ यांना समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांना दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल २०२३ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संस्थानच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०,००० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच भारतासह परदेशात ४.५४ लाखांहून अधिक व्यक्तींना मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ मिळाला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading