Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

‘पत्रकारिता – धावपळ आणि अनिश्चितता’ या विषयावर संवाद

 

पत्रकारितेवर आधारित ‘फ्रेम’ या मराठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग 

पुणे  : पुणे शहरातील कला, संस्कृती आणि अर्थपूर्ण संवादांना व्यासपीठ देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी चित्रपट ‘फ्रेम’चा विशेष शो बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता नॅशनल फिल्म अर्काईव्हज, प्रभात रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ‘पत्रकारिता-धावपळ आणि अनिश्चितता’ या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, इंडियन एक्स्प्रेसचे छायाचित्रकार पवन खेंगरे, महाराष्ट्र टाइम्सचे चीफ रिपोर्टर सुनीत भावे आणि लेखक-दिग्दर्शक विक्रम पटवर्धन सहभागी होणार असून राजेश दामले सूत्रसंचालन करतील. पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व सभासदांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘फ्रेम’ हा पत्रकारीतेवर आधारित सामाजिक चित्रपट असून त्यामध्ये पत्रकारांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचे चित्रण केले आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विक्रम पटवर्धन असून अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading