टाटा एआयएमध्ये गुंतवणूक करणे का योग्य आहे? सातत्यपूर्ण सर्वोत्तम परतावा, स्वतंत्रपणे प्रमाणित
मुंबई : दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की, एखादा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर बाजारातील चढ-उतारांच्या काळात सातत्याने चांगले मूल्य देऊ शकतो का? टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सचा ट्रॅक रेकॉर्ड याचे एक भक्कम प्रमाण आहे. ३१ जुलै २०२६ पर्यंत, कंपनीच्या मल्टी कॅप फंड, टॉप २०० फंड आणि इंडिया कन्झम्प्शन फंड यांनी एक आणि पाच वर्षे, या दोन्ही कालावधीत S&P BSE 200 पेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. या कामगिरीला स्वतंत्रपणे देखील प्रमाणित करण्यात आले आहे: जून २०२६ पर्यंत, टाटा एआयएच्या रेटेड एयुएमच्या ९६% पेक्षा जास्त भागाला ४ किंवा ५-स्टार मॉर्निंगस्टार रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे त्याचे बहुतांश फंड्स आपल्या कॅटेगरीमध्ये टॉप रेटिंग असलेल्या फंड्समध्ये सामील झाले आहेत.
“हे रेटिंग केवळ एका चांगल्या वर्षाचा परिणाम नाही, तर ते आमच्या फंड व्यवस्थापन धोरणाला दर्शवते, ज्याचे आम्ही बाजाराच्या प्रत्येक चक्रात सातत्याने पालन केले आहे: शिस्तबद्ध विविधीकरण, सक्रिय जोखीम व्यवस्थापन आणि अल्पकालीन चढ-उतारांच्या मागे न धावणे. आमच्या पॉलिसीधारकांसाठी या शिस्तीचा थेट अर्थ असा आहे की, कोणत्याही प्रकारच्या बाजारपेठेत त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन पूर्ण सातत्य आणि जबाबदारीने केले जात आहे. आम्ही या मान्यतेकडे आमच्या जबाबदारीचे प्रमाण म्हणून पाहतो, अंतिम ध्येय म्हणून नाही.”
— हर्षद पाटील, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स
चढ–उतारांच्या बाजारपेठेतही मजबूत कामगिरी
भारतीय शेअर्ससाठी वर्ष २०२६ हे चढ उतारांचे राहिले आहे — कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि अमेरिकन व्याजदरांबाबत बदलत्या अपेक्षांमुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. या सर्वांनंतरही, टाटा एआयएचे प्रमुख फंड्स आपल्या बेंचमार्कच्या पुढे राहिले आहेत:
| टाटा एआयए फंड | सुरुवात झाल्याची तारीख | ५-वर्षांचा फंड परतावा (सीएजीआर) | ५-वर्षांचा बेंचमार्क परतावा (सीएजीआर) | सुरुवातीपासूनचा फंड परतावा | सुरुवातीपासूनचा बेंचमार्क परतावा |
| मल्टी कॅप फंड | 05-Oct-15 | 15.83% | 10.67% | 19.43% | 11.76% |
| टॉप २०० फंड | 12-Jan-09 | 16.47% | 10.67% | 18.27% | 14.31% |
| इंडिया कन्झम्प्शन फंड | 05-Oct-15 | 17.19% | 10.67% | 19.17% | 11.76% |
| होल लाईफ मिड कॅप इक्विटी फंड | 10-Jan-07 | 17.66% | 17.73% | 15.95% | 13.74% |
| टॉप ५० फंड | 12-Jan-09 | 12.58% | 9.12% | 13.92% | 13.18% |
टीप: मागील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. मार्केट लिंक्ड गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे.
आकडेवारी ३१ जुलै २०२६ पर्यंतची आहे. मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या परताव्याची गणना सीएजीआर म्हणून केली जाते.
बेंचमार्क: S&P BSE 200, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी 50SFIN (एसएफआयएन): टॉप 200 फंड ULIF 027 12/01/09 ITT 110| मल्टी कॅप फंड ULIF 060 15/07/14 MCF 110| इंडिया कन्झम्पशन फंड ULIF 061 15/07/14 ICF 110| होल लाइफ मिड कॅप इक्विटी फंड ULIF 009 04/01/07 WLE 110| टॉप 50 फंड ULIF 026 12/01/09 ITF 110
मॉर्निंगस्टार रेटिंग: थर्ड-पार्टीचा पुरावा
थर्ड-पार्टी रेटिंग गुंतवणूकदारांना फंडाच्या गुणवत्तेचा एक स्वतंत्र मापदंड प्रदान करते. या बाबतीत टाटा एआयए सर्वात वेगळी आणि उजवी ठरते, कारण ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या तिच्या एकूण ₹१,४५,५८९ कोटींच्या एयुएमच्या तुलनेत, जून २०२६ पर्यंत कंपनीच्या रेटेड एयुएमच्या ९६% पेक्षा जास्त भागाला ४ किंवा ५-स्टार मॉर्निंगस्टार रेटिंग मिळाले आहे.
टाटा एआयए हे कसे साध्य करते?
ही उत्कृष्ट कामगिरी फंड व्यवस्थापनाचा सातत्यपूर्ण दृष्टिकोनाला दर्शवते, जो या प्रमुख स्तंभांवर आधारलेला आहे:
- मार्केट कॅप आणि सेक्टर्समध्ये सक्रिय पोर्टफोलिओ निर्मिती.
- शिस्तबद्ध संपत्ती वाटप आणि वेळोवेळी रिबॅलेंसिंग.
- दीर्घकालीन आणि उद्दिष्टांवर आधारित दृष्टिकोन, जो बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांऐवजी सातत्याने मिळणाऱ्या चक्रवाढ परताव्यावर लक्ष केंद्रित करतो.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी याचे काय अर्थ आहेत?
दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती करण्याचा थेट अर्थ बाजाराच्या प्रत्येक चक्रात गुंतलेले राहणे हा आहे. एक काल्पनिक उदाहरण घेऊ, समजा जर पाच वर्षांपूर्वी मल्टी कॅप फंडमध्ये ₹१० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती*, तर तिच्या १५.८३% सीएजीआरच्या आधारे आज तिचे मूल्य अंदाजे ₹२०.९ लाख रुपये झाले असते. याउलट, बेंचमार्कच्या १०.६७% सीएजीआरनुसार हे मूल्य ₹१६.६ लाख रुपये झाले असते — म्हणजेच दोघांमध्ये जवळपास ₹४.३ लाख रुपयांचा फरक दिसून आला असता.
*टाटा एआयएचे यूलिप दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसोबतच लाइफ इन्शुरन्स कव्हरचे एक उत्तम कॉम्बिनेशन प्रदान करतात. हे गुंतवणूकदारांना त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देत आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करतात.
मुख्य निष्कर्ष
टाटा एआयएचे बेंचमार्कपेक्षा सरस प्रदर्शन आणि उत्कृष्ट मॉर्निंगस्टार रेटिंग हे त्यांच्या गुंतवणूक दृष्टिकोनाचा एक स्पष्ट पुरावा देतात, तर त्यांचे यूलिप सुरक्षेसोबतच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा एक भक्कम ताळमेळ सुनिश्चित करतात.
वरील उदाहरण ऐतिहासिक कामगिरीवर आधारित आहे; याकडे भविष्यातील परताव्याचा अंदाज किंवा हमी म्हणून पाहिले जाऊ नये.
गुंतवणूकदार या फंड्सबद्दल आणि टाटा एआयएच्या गुंतवणूक योजनांबद्दल अधिक माहिती www.tataaia.com या वेबसाईटवर पाहू शकतात.
