Wednesday, August 26, 2026
ENTERTAINMENTLatest News

मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

कलर्स मराठीवरील ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत सध्या अत्यंत थरारक आणि रंजक वळण आले आहे. मोहिनी आणि RK यांच्या नात्यात एकापाठोपाठ एक वादळे येत असतानाच, अमरापूरमध्ये एका भयंकर संकटाने अचानक डोकं वर काढलं आहे. प्रतापरावने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मोहिनीवर थेट गोळी झाडली आहे. RK आणि महेंद्रच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचेच धाबे दणाणले असून मालिकेचे कथानक आता अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्याकाळी ७:३५ वाजता फक्त कलर्स मराठीवर.

अमरापूरच्या संघर्षात शालिनी, कार्तिकी आणि पिंकीच्या सुटकेच्या प्रयत्नात प्रतापरावचा सुडबुद्धीचा भयानक प्लान समोर आला आणि त्यातूनच मोहिनीवर हा प्राणघातक हल्ला झाला.
गोळी लागल्याने मोहिनीची जगण्याची धडपड सुरू झाली असून, आता तिच्या नशिबात नेमकी सातजन्मांची साथ लिहिली आहे की सात महिन्यांतच या संसाराचा शेवट होणार, या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या भीषण प्रसंगातून मोहिनी सुखरूप बाहेर पडेल का? मोहिनीच्या या अवस्थेनंतर RK मधील चांगुलपणा जागा होऊन तो प्रतापरावविरोधात कोणते मोठे पाऊल उचलणार? पुढे काय वळण घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कथेच्या पाठीमागच्या घटनांचा विचार केल्यास, RK आणि मोहिनीच्या अनपेक्षित लग्नानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मालिकेत RK कसा मोहिनीला सात महिन्यांत सोडायला सांगतो आणि मोहिनी ही सात जन्मांची साथ कशी निभावणार? RK तिला कसा त्रास देणार आणि मोहिनी या सगळ्या परिस्थितीला कशी सामोरी जाणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.लग्नानंतर मिळालेल्या अपमानांचा आणि RK च्या रागाचा सामना करत मोहिनी कसं घरच्यांचं मन जिंकणार? मोहिनी येत्या भागांमध्ये कोणतं मिशन हाती घेणार आहे? तर दुसरीकडे दीपाच्या कारस्थानांचा पर्दाफाश कसा आणि कधी होणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्याकाळी ७:३५ वाजता फक्त कलर्स मराठीवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading