Friday, October 9, 2026
Latest NewsPUNE

धर्मांतर कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्याची रिपब्लिकन पार्टीची मागणी

पुणे : महाराष्ट्रात लागू होणाऱ्या नव्या धर्मांतरविरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले.

हे निवेदन पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सचिव महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्टोपर राजमनी, उपाध्यक्ष इशु दोरोस्वामी , शहर सचिव स्टॅनली मेथन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनानुसार, धर्मांतर विषयक नवीन कायदा २८ ऑगस्ट २०२६ पासून राज्यात लागू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या कायद्यांतर्गत खडकी पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.

नवीन कायदा लागू होण्यापूर्वीच त्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित गुन्हा रद्द करावा, अन्यथा पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. पक्षाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading