Tuesday, November 24, 2026
BusinessLatest News

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन – खाद्यपदार्थांचा दर्जा अबाधित राखल्यास देशी मत्स्यपालनाचे भविष्य घडणार

 

– कॅप्टन (डॉ.) ए. वाय.राजेंद्र, मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिमल न्यूट्रिशन बिझनेस, गोदरेज अग्रोवेट.

 

देशात मस्त्यपालन क्षेत्राची मागणी वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्राचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि देशाच्या निळ्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त या क्षेत्राची आजवरची प्रगती पाहणे गरजेचे आहे. तसेच या क्षेत्राचा विस्तार होण्याकरिता आवश्यक मुद्द्यांवरही चर्चा करायला हवी. सततच्या वाढत्या मागण्या लक्षात घेत केवळ उत्पादनांवर न भर देता, चांगल्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची गरज आहे.

भारतातील मत्स्य उत्पादनात आता वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दहा वर्षांच्या उलाढालीतून हे दिसून येते. २०१३-१४ ते २०२४-२५ या काळात उत्पादन निर्मितीत दुपटीहून जास्त वाढ झाली. हे उत्पादन ९५.७९ लाख टनांहून थेट १९७.७५ लाख टनांपर्यंत नोंदवले गेले आहे. हे नीलक्रांतीच्या यशाचे द्योतक आहे. मात्र, या क्षेत्राच्या पुढील वाढीसाठी फक्त जास्त मत्स्य उत्पादनावर अवलंबून राहता येणार नाही. त्याऐवजी उत्पादकता कशी वाढेल, यावरच या क्षेत्राचा विकास ठरेल.

याकरिता अंतर्गत मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रात उपलब्ध साधनांचा योग्य वापर करायला हवा. चांगल्या दर्ज्याच्या माशांची पैदास व्हायला हवी. यामुळे निर्यातीच्या संधी वाढतील. उत्पादन खर्च कमी होईल तसेच, शेतक-यांचे उत्पन्नही वाढेल. या बदलाच्या केंद्रस्थानी  माशांच्या खाद्याला महत्त्व द्यायला हवे. मत्यपालनाच्या एकूण खर्चात खाद्याचा वाटा हा सुमारे ४० ते ६० टक्के असतो. खाद्याच्या किंमतीसोबतच त्याचा दर्जाही महत्त्वाचा ठरतो. खाद्यातील पोषक घटक आणि पचनक्षमता माशांची वाढ, आरोग्य आणि उत्पादनाच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतात.

चांगल्या दर्ज्याच्या उत्पादन क्षमतेचे मोजमापही करायला हवे. ‘फीड कन्व्हर्जन शो’ या मोजमाप पद्धतीतून ही कार्यक्षमता ठरवली जाते. ठराविक प्रमाणात माशांचे वजन वाढवण्यासाठी किती खाद्य लागते, याचे हे प्रमाण असते. समजा एखादा शेतकरी एक टन माशांचे उत्पादन घेत असेल आणि त्याने हे प्रमाण १.८ वरुन १.५ पर्यंत कमी केले तर उत्पादनात कोणतीही घट न होता थेट ३०० किलो खाद्याची बचत होते. उत्पादनाच्या अशा अनेक टप्प्यांमध्ये ही सुधारणा झाली तर मत्स्यपालकांची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते.

याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले आणि माशांच्या प्रकारानुसार बनवलेले खाद्य वापरणे गरजेचे आहे. संतुलित पोषण, सहज पचणारे खाद्य आणि ते देण्याची योग्य पद्धत यामुळे खाद्याच पूरेपर वापर होतो. यातून माशांची वाढ एकसारखी होते आणि शेतक-यांनी खाद्यावर खर्च केलेल्या पैशांचा पुरेपूर फायदा मिळतो. यासोबतच शेतक-यांना योग्य माहिती व प्रशिक्षण मिळणेही महत्त्वाचे आहे. खाद्य देण्याचे वेळापत्रक, तलावाची स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धतींमुळे माशांचे आरोग्य चांगले राहते आणि उत्पादनही वाढते.

खाद्याचा योग्य वापर होणे हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. खाद्याचा योग्य वापर न झाल्यास त्याची नासाडी होते. यातून उरलेले अतिरिक्त पोषक घटक पाण्यात मिसळतात. माशांनी न खाल्लेले खाद्य आणि त्यांच्या विष्ठेतून पाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरचे प्रमाण वाढू शकते. खाद्याची पचनक्षमता सुधारल्यास आणि पोषक घटकांचा योग्य वापर झाल्यास हे नुकसान टाळता येते. त्यामुळे खाद्याचा कार्यक्षम वापर करणे ही पैशांची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही दृष्टींनी काळाची गरज आहे.

पण केवळ चांगले खाद्य दिल्याने सर्वोत्तम उत्पादन मिळतेच असे नाही. माशांची जात, त्यांचा आकार, एकूण वजन आणि सभोवतालचे वातावरण यानुसार खाद्याची गरज बदलते. खाद्यातील पोषक तत्त्वांचा फायदा मिळण्यासाठी योग्य वेळापत्रकाचे पालन व्हायला हवे. माशांच्या खाद्याच्या प्रमाणावरही लक्ष द्यायला हवे. याशिवाय तलावाचे आणि शेतीचे योग्य व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे असते.

या सर्व सुविधा शेतक-यांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. डिजिटल माध्यमांतून शेतक-यांना योग्य वेळी सल्ला मिळू शकतो. खाद्य कसे द्यावे आणि पाण्याचा दर्जा कसा राखावा, याची वेळेवर माहिती मिळाल्यास शेतकरी योग्य निर्णय घेऊ शकतात. चांगल्या प्रतीचे खाद्य सहज उपलब्ध होण्यासाठी मजबूत वितरण व्यवस्था असणे गरजेचे आहे. विशेषतः लहान आणि नव्याने वाढणा-या मत्स्यपालन विभागात हे खाद्य नियमितपणे मिळायला हवे.

आता माशांच्या पोषणविषयात अनेक महत्त्वाचे संशोधन होत आहे. खाद्य निर्मितीचा दर्जा उंचावत असल्याने मत्स्य उद्योग वेगाने बदलत आहे. माशांची रोगप्रतिकारत शक्ती, पचनसंस्थेचे आरोग्य आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी विशेष घटकांचा शोध घेतला जात आहे. तसेच, कीटकांपासून मिळणा-या प्रथिनांसारखे पर्यायी स्त्रोत कच्च्या मालाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. स्वयंचलिक खाद्य प्रणाली आणि माहितीवर आधारित शेती व्यवस्थापनामुळे खाद्य देण्याची अचूकता वाढू शकते. यामुळे टाळता येण्याजोगे नुकसान कमी होण्यास मोठी मदत होते.

या क्षेत्रातील विकास हे नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. या दोहोंचा मत्स्य शेतीवर कितपत फायदा होतो, यावर अवलंबून आहे. केवळ माशांचे उत्त्पन्न वाढवणे याकडेच केवळ लक्ष देणे चुकीचे ठरेल. शाश्वत आणि दीर्घकाळ विकासासाठी धोरणात्मक नियोजनांची गरज आहे. त्यासाठी शेतक-यांना खाद्यापासून ते प्रत्येक थेंबापासून प्रत्येक घटकाचा परतावा मिळायला हवा. इतर सर्व साधनांचा अपव्यय न करता त्यातून जास्तीत जास्त मूल्य निर्माण करणे आवश्यक आहे. या जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्ताने, भारताच्या मत्स्यपालन धोरणाच्या केंद्रस्थानी पोषणातील नवे शोध आणि खाद्याचा योग्य व कार्यक्षम वापर करणेही महत्त्वाचे आहे. या धोरणात्मक पावलांमुळे शेतक-यांसाठी फायदेशीर आणि पर्यावरणाचा समतोल राखणारी सक्षम नील अर्थव्यवस्था उभी राहण्यास मदत होईल.

Leave a Reply