Saturday, October 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रशांत किशोर आमच्यासाठी काम करणार वगैरे कशाचीच नाही माहिती – सुनील तटकरे

मुंबई  : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणार असल्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती. नाही. त्यांना पक्षाचे राजकीय सल्लागार नियुक्त करायचे असेल तर आपल्याला त्याबद्दल नक्की माहिती देण्यात आली आहे, असा दावा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

प्रशांत किशोर यांनी देवगिरी शासकीय निवासस्थामी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर काम करणे अपेक्षित असेल तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद इतर नेत्यांकडे देणे गरजेचे आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्षां बरोबर आपण काम करू शकत नाही, असे सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितले. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रशांत किशोर आमच्या पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत किंवा होणार आहेत, ही वस्तुस्थिती असती तर आपल्याला त्याबद्दल निश्चितपणे माहिती दिली गेली असती. कोणतेही निर्णय आम्ही आपसामध्ये चर्चा करून घेत असतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर जाण्याच्या निर्णयासारखा महत्त्वाचा निर्णयसुद्धा आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा करून घेतलेला आहे, असे तटकरे यांनी सांगितले. पक्ष नेतृत्व आपल्यावर नाराज असल्याची माहिती प्रसार माध्यमांना कोणत्या सूत्रांकडून मिळते हे आपल्याला कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला असता आमचे राजकीय दिशा ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला वगैरे असा विषयच येत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सामूहिक नेतृत्वाने घेतला. त्यानंतर हा संदेश राज्यभरातील कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व नेत्या कार्यकर्त्यांनी राज्याचा कानाकोपरा पालथा घातला आहे, असा दावाही तटकरे यांनी केला.

यावेळी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आलेखही तटकरे यांनी मांडला. आपण 1985 पासून सलग 41 वर्ष राजकारणात आहोत. रोहा तालुक्याचा सरचिटणीस म्हणून पहिली जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली. त्याच वर्षी आपल्याला विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी मिळाली. एवढा दीर्घकाळ राजकारणात राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात आपण काम केले आहे. याचा अर्थ आपल्याकडे काही किमान पात्रता असणारच, असेही तटकरे यांनी उपहासाने नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading