Sunday, May 24, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मुंबई विमानतळावर ११.२५ कोटींचे कोकेन जप्त; चार परदेशी नागरिक अटकेत


मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ११ कोटी २५ लाख रुपये किमतीचे २ किलो २५ ग्रॅम कोकेन जप्त केले. या प्रकरणी चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर विमानतळावर दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. संशयित प्रवाशांची तपासणी केली असता त्यांनी कोकेनने भरलेल्या कॅप्सूल गिळून भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय प्रक्रियेनंतर आरोपींच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात कोकेनयुक्त कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ११.२५ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणातील सर्व आरोपी परदेशी नागरिक असून त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करीमागे कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा तपास आता डीआरआयकडून सुरू करण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर अलीकडच्या काळात अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपासणी अधिक कडक केली असून, अशा कारवायांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading