बी. आर. कुलकर्णी यांचे निधन
दौंड येथील निवृत्त स्टेशन सुप्रिंटेंडेंट आणि ट्रैवेलिंग इन्स्पेक्टर बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी (बी. आर. कुलकर्णी) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक १० मे रोजी दुःखद निधन झाले. गेले २ दशकांहून अधिक काळ कुलकर्णी पुण्यात वास्तव्यास होते.
बी. आर कुलकर्णी हे नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनच्या सोलापूर विभागाचे सुमारे १८ वर्ष सचिव होते. सेवानिवृत्ती नंतर ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष तर पेन्शनर असोसिएशन ऑफ रेल्वेचे राष्ट्रीय उपसचिव म्हणून देखील त्यांनी काम पहिले. निवृत्ती नंतर पुण्यात स्थायिक होऊन त्यांनी शेकडो रेल्वे कामगारांची पेन्शनची कामे मार्गी लावून देण्यात मोठे योगदान दिले.
बांधकाम व्यावसायिक, वास्तुशोध प्रोजेक्टसचे सचिन व नितीन कुलकर्णी यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी २ मुले, सूना व ३ नातवंडे असा परिवार आहे.
