Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

अमनोरा पार्क टाउन झाले एलपीजी फ्री झोन

ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने अमनोरा एमएनजीएल चे सहकार्य

पुण्यातील शाश्वत नागरी जीवनाचे एक आदर्श उदाहरण

पुणे : अधिक सुरक्षित आणि शाश्वत नागरी पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ‘अमनोरा पार्क टाउन’ला अधिकृतपणे ‘एलपीजी फ्री झोन’ अर्थात ‘एलपीजी मुक्त क्षेत्र’म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंबंधीची घोषणा अमनोरा टाउनशिप मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान करण्यात आली. यावेळी अमनोरा पार्क टाउन विकसित करत असलेल्या सिटी कॉर्पोरेशचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, एमएनजीएलचे कुमार शंकर, मेजर शंकर करजगी उपस्थितीत होते.

‘अमनोरा पार्क टाउन’ हे ‘एलपीजी फ्री झोन’ म्हणून घोषित होणे ही बाब ऊर्जा वापरामध्ये झालेला एक प्रगतीशील बदल दर्शवणारे एक महत्वाचे पाउल असून आधुनिक निवासी संकुलांमध्ये पाईपद्वारे नॅचरल गॅसचा पुरवठा करण्याचे महत्व अधोरेखित करते.

वर्ष २०११ पासून पाईपद्वारे गॅसचा पुरवठा करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा व स्वीकारण्याच्या बाबतीत अमनोरा पार्क टाउनने लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. आज, या टाउनशिपने सर्व सदनिकांमध्ये १०० टक्के पाईपद्वारे गॅसचा पुरवठा करण्यात येतो. येथे असलेल्या १० हजार हून अधिक सदनिकांमध्ये पाइपद्वारे गॅसची जोडणी करण्यात आली आहे. हे स्थित्यंतर ऊर्जा क्षेत्रातील एका सुयोनियोजित आणि कार्यक्षम बदलाचे प्रतिबिंब असण्याबरोबरच सुरक्षा, सोय आणि पर्यावरणीय शाश्वततेशी देखील सुसंगत आहे.

अमनोरा आणि एमएनजीएल यांनी ‘एलपीजी फ्री झोन’चे एक आदर्श मॉडेल विकसित केले आहे. जे इतरांसाठी देखील दिशादर्शक ठरेल. अमनोरा ने घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातही यशस्वी प्रकल्प राबवले आहेत. त्याचप्रमाणे, कचऱ्यापासून ऊर्जा  निर्मितीसाठी ‘कॉम्प्रेस्ड बायो गॅस’ प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाचा विस्तार करण्याची अमनोराची योजना आहे. विशेषतः महाराष्ट्र शासनाचे ‘कॉम्प्रेस्ड बायो गॅस’ धोरण, २०२६ अंतर्गत भविष्यातील इंधनाचा विकास करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारचे सर्व प्रयत्न राष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षा धोरणात मोलाचे योगदान देतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading