Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई प्रतिनिधी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी, ही केवळ सदिच्छा भेट होती. या कोणत्याही स्वरूपाची राजकीय चर्चा झाली नाही, असे बावनकुळे यांनी भेटीनंतर स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर माझ्यावर मंत्रीपदाची जबाबदारी आली. निवडणुकीच्या वेळी मी राज ठाकरे यांना आपल्याकडे चहा घ्यायला येणार आहे, असे सांगितले होते. तो योग आज आढळून आल्यामुळे आपण राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चहाबरोबर चर्चा केली, असे बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबई विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेतील गट यांची युती होती. हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीचा आग्रह, या मुद्द्यांवर तब्बल २० वर्षांनी एकत्र येत ठाकरे बंधूंनी राजकीय जवळीकही साधली. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली होती. मात्र, त्यावेळी ठाकरे बंधू फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे आणि राज ठाकरे यांची भेट चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading