Friday, May 8, 2026
Latest NewsSports

अष्टपैलु स्पोर्ट्‌स संघाला विजेतेपद !!

पुणे :  स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे पहिल्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड करंडक‌’ १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्वयम नरकडे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अष्टपैलु स्पोर्ट्‌स संघाने ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीचा ९ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीचा डाव २१.३ षटकात ८६ धावांवर संपुष्टात आला. अभिन्यान साळुंके याने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली. स्वयम नरकडे याने ९ धावा देत तीन गडी बाद केले. दुसऱ्या बाजूने रितेश चांदगुडे याने तीन धावांमध्ये तीन गडी टिपत ब्रिलीयंट्स संघाचा डाव झटपट गुंडाळला. हे माफक लक्ष्य अष्टपैलु स्पोर्ट्‌सने १२.२ षटकात व १ गडी गमावून सहज पूर्ण केले. सलामीची खेळाडू गौरवी पंचवरे हिने नाबाद ३२ धावा आणि सिद्धांत सिंग याने नाबाद ३० धावांची खेळी करून ८५ धावांची अभेद्य भागिदारी रचून संघाच्या विजयासह विजेतेपद निश्चित केले.

‘रौप्य करंडका‌’साठीच्या सामन्यात ध्रुव चवंदके याने केलेल्या ६७ धावांच्या जोरावर आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमीने किरण क्रिकेट ॲकॅडमीचा ७५ धावांनी पराभव करून विजय मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण औंध जिल्हा रूग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी दत्ता शृंगारे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ट्रस्टी विजय शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि अमित काळे, सहभागी संघांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते. विजेत्या अष्टपैलु स्पोर्ट्‌स संघाला आणि उपविजेत्या ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमी संघाला करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः सुवर्ण करंडकः
ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीः २१.३ षटकात १० गडी बाद ८६ धावा (अभिन्यान साळुंके २३, स्वर नागवडे १२, स्वयम नरकडे ३-९, रितेश चांदगुडे ३-३) पराभूत वि. अष्टपैलु स्पोर्ट्‌सः १२.२ षटकात १ गडी बाद ८७ धावा (गौरवी पंचवरे नाबाद ३२, सिद्धांत सिंग नाबाद ३०, रूद्रांश रेड्डी १-८); सामनावीरः स्वयम नरकडे;

रौप्य करंडकः आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमीः २५ षटकात ४ गडी बाद १९२ धावा (ध्रुव चवंदके ६७ (५१, ८ चौकार), रिशीक गुहा ५४ (५१, १० चौकार), आर्यवीर गोस्वामी २-२१); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी रिशीक आणि ध्रुव यांच्यात १५० (१०८) वि.वि. किरण क्रिकेट ॲकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद ११७ धावा (काव्या जंगम ३०, आदित्य ढमढेरे १-११, प्रतिवीमन जाधव १-१५); सामनावीरः ध्रुव चवंदके;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः शौर्य शेलार (ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः वीरा निकम (१५० धावा; ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमी);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः रितेश चांदगुडे (६ विकेट; अष्टपैलु स्पोर्ट्‌स);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः सिद्धांत सिंग (३ बाद; अष्टपैलु स्पोर्ट्‌स);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः अवनीश दबले (४ बाद; अष्टपैलु स्पोर्ट्‌स);
उदयोन्मुख खेळाडूः कार्तिक सिंग (अष्टपैलु स्पोर्ट्‌स);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading