सिटी इंडिया’च्या मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स (M&A)च्या प्रमुखपदी राज राठी यांची नियुक्ती
मुंबई – सिटीने (Citi) भारतामध्ये आपले मर्जर्स अँड ऍक्विजिशन्सचे प्रमुख म्हणून श्री राज राठी यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. त्यांचा कार्यकाळ जून २०२६ पासून सुरू होईल. त्यांचे कार्यालय मुंबईत असेल आणि त्यांच्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) आणि काही निवडक B2B कॉमर्स कंपन्यांच्या सेक्टर कव्हरेजची जबाबदारी देखील असेल.
श्री राज राठी भारतातील सिटीच्या ‘एम अँड ए’ (M&A) विभागाचे नेतृत्व करतील. तसेच क्लिष्ट आणि मोठ्या व्यवहारांसाठी धोरणात्मक सल्ला देणे आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमधील ग्राहकांशी संबंध अधिक दृढ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ग्राहकांना एकात्मिक सेवा देण्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मार्केट्स आणि इतर उत्पादन समूहांमधील भागीदारांसोबत मिळून काम करतील.
इन्व्हेस्टमेंट बँकिंग, एम अँड ए आणि गुंतवणूक सल्लागार क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक काळचा अनुभव गाठीशी असलेले श्री राज राठी ‘सिटी’मध्ये येण्यापूर्वी ते ‘ड्रीम स्पोर्ट्स’ मध्ये ‘स्ट्रॅटेजी आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंट’ प्रमुख म्हणून कार्यरत होते. या पदावर असताना त्यांनी धोरणात्मक भागीदारी आणि व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उपक्रमांचे नेतृत्व केले, ज्याअंतर्गत विविध प्रकल्पांमध्ये सुमारे १५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली.
श्री राज राठी अशा वेळी ‘सिटी’मध्ये सामील होत आहेत जेव्हा कंपनीचा भारतातील ‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ व्यवसाय एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. व्यवहारांच्या मूल्याच्या आधारावर २०२४ आणि २०२५ मध्ये ‘सिटी’ सातत्याने भारतातील प्रथम क्रमांकाचे ‘एम अँड ए’ (M&A) सल्लागार राहिले आहे. कंपनीच्या मजबूत अंमलबजावणी क्षमता आणि ग्राहकांशी असलेले दृढ संबंध यातून अधोरेखित होतात. ‘युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड’साठी ‘रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ची १००% भागीदारी विक्री आणि ‘हायर ग्रुप’साठी ‘हायर इंडिया’मधील ४९% भागीदारी विक्री यांसारख्या अलीकडील ऐतिहासिक व्यवहारांमधील ‘सिटी’ने बजावलेल्या विशेष आर्थिक सल्लागार भूमिकेमुळे त्यांच्या अड्वायजरी प्लॅटफॉर्मची ताकद स्पष्ट होते.
