Sunday, May 3, 2026
Latest NewsSports

एलाईट ईगल्स्‌ संघाला विजेतेपद !!

पुणे :  स्केलअप क्रिकेट ॲकॅडमी यांच्यावतीने आयोजित ‘स्केलअप करंडक‌’ आंतरक्लब १९ वर्षाखालील गटाच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आदर्श रावल याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर एलाईट ईगल्स्‌ संघाने डेक्कन जिमखाना संघाचा १२७ धावांनी पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

वारजे, सिंहगड रोड येथील स्केलअप क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना एलाईट ईगल्स्‌ संघाने ३९.२ षटकात २६३ धावांचे लक्ष्य उभे केले. संघाचा डाव उभा करताना आदर्श रावल (४७ धावा), आयुश शर्मा (३४ धावा), अहान आठवले (३३ धावा), प्रणव शिंदे (३३ धावा), आदित्य हिरवे (२५ धावा) आणि विजेंद्र सिंग (२२ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. डेक्कनच्या मल्हार गोरे आणि सोहम काकडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. एलाईटकडून दुसऱ्या गड्यासाठी आदर्श आणि विजेंद्र सिंग यांनी ४८ चेंडूत ६९ धावांची भागिदारी रचली. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेक्कन जिमखानाचा डाव ३८ षटकात १३६ धावांवर संपुष्टात आला. डेक्कनकडून विहान केंजळे (३६ धावा) आणि अलाप पंगु (३२ धावा) यांनी प्रतिकार केला. आतिश गावडे आणि यशराज शिंदे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून एलाईट ईगल्स्‌ संघाचा विजय निश्चित करून विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार राहूलदादा कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्केलअप क्रिकट ॲकॅडमीचे संचालक अभिजीत साळवी, स्केलअप क्रिकट ॲकॅडमीचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक संदीप चव्हाण, ॲकॅडमीचे संचालक परवेझ खान, संचालक नवाझ खान, जी९ बिझनेस हब आणि संस्कृती सभागृहाचे संचालक अजित घोसले आणि समीर सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
एलाईट ईगल्स्‌ः ३९.२ षटकात १० गडी बाद २६३ धावा (आदर्श रावल ४७, आयुश शर्मा ३४, अहान आठवले ३३, प्रणव शिंदे ३३, आदित्य हिरवे २५, विजेंद्र सिंग २२, मल्हार गोरे ३-४४, सोहम काकडे ३-४८); (भागिदारीः दुसऱ्या गड्यासाठी आदर्श आणि विजेंद्र सिंग ६९ (४८) वि.वि. डेक्कन जिमखानाः ३८ षटकात १० गडी बाद १३६ धावा (विहान केंजळे ३६, अलाप पंगु ३२, आतिश गावडे २-२०, यशराज शिंदे २-३२); सामनावीरः आदर्श रावल;

वैयक्तिक पारितोषिकः

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः सार्थक बिराजदार (१८० धावा १० विकेट, डेक्कन जिमखाना);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः आदर्श रावल (१९७ धावा; एलाईड ईगल्स्‌);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः अन्श टिल्लु (१६ विकेट; राजस्थान रॉयल्स्‌ ॲकॅडमी पुणे);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः आयुष शर्मा (१२ बाद; एलाईट ईगल्स्‌);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading